पाकिस्तान: विजयाचा जीवघेणा जल्लोष!; कराचीत हवेत गोळीबार, १२ जखमी


कराची: टी-२० विश्वचषकात भारताविरोधात पाकिस्तानी संघाने विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेट चाहते आनंद साजरा करण्यासाठी रस्त्यांवर उतरले. पाकिस्तानमध्ये ठिकठिकाणी फटाके फोडण्यात आले. मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यांवर उतरले होते. या विजयोत्सवा दरम्यान काही पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी हवेत गोळीबार केला. विविध ठिकाणी झालेल्या या गोळीबाराच्या घटनेत काही जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.


कराचीत पोलीस कर्मचारीदेखील जखमी

कराची पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री विजयोत्सव साजरा करण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये गोळीबार करण्यात आला. या दरम्यान, अज्ञातांच्या गोळीबारात एका पोलीस उपनिरिक्षकासह १२ जण जखमी झाले होते. कराचीतील ओरंगी टाउन सेक्टर-४ आणि ४के चौरांगी भागात अज्ञात ठिकाणांहून झालेल्या गोळीबारात दोन जण जखमी झाले. गुलशन-ए-इक्बालमध्ये हवेत गोळीबार करणाऱ्यांविरोधात कारवाई करताना एका पोलीस उपनिरिक्षकाला गोळी लागली.

भारतीय पाणबुडी आमच्या हद्दीत शिरली; पाकिस्तानचा कांगावा, व्हिडिओ जारी
इम्रान खान यांच्याकडून शुभेच्छा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि १९९२ चे विश्वचषक विजेते माजी कर्णधार इम्रान खान यांनीही पाकिस्तानच्या विजयानंतर ट्विट करत म्हटले की, पाकिस्तान संघाचे आणि विशेषतः बाबर आझमचे अभिनंदन त्याने संघाचे नेतृत्व केले. रिझवान आणि शाहीन शाह आफ्रिदी यांनीही चमकदार कामगिरी केली. देशाला तुमचा अभिमान आहे.’ टी-२० विश्वचषकापूर्वी इम्रान खान यांनी संघाची भेट घेतली होती.

मोदी फोन उचलत नाही, बायडन फोन करत नाहीत; इम्रान खान यांच्यावर विरोधी पक्षांची टीका

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनीदेखील संघाचे अभिनंदन केले. हा पहिला विजय आहे, सर्वात आश्चर्यकारक, पण आता प्रवास सुरू झाला आहे, हे लक्षात ठेवा. सर्व पाकिस्तानींसाठी अभिमानाचा क्षण आणि आनंद लुटण्यासाठी हा क्षण दिलेल्या खेळाडूंचे आभार मानत असल्याचे त्यांनी म्हटले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: