ट्रम्प यांचे नाव जोडताच मिळाला सोन्याचा भाव ; तब्बल १६५७ टक्क्यांनी वधारलाय ‘हा’ शेअर


हायलाइट्स:

  • अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा व्यवसायात सक्रिय झाले आहेत.
  • बुधवारी त्यांनी आपल्या नवीन मीडिया कंपनीचे एका शेल कंपनीमध्ये विलीनीकरण करण्याची घोषणा केली.
  • यामुळे शुक्रवारी कंपनीचे शेअर्स २८४ टक्क्यांनी वधारले.

नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा व्यवसायात सक्रिय होण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी त्यांनी आपल्या नवीन मीडिया कंपनीचे एका शेल कंपनीमध्ये विलीनीकरण करण्याची घोषणा केली. यामुळे शुक्रवारी कंपनीचे शेअर्स २८४ टक्क्यांनी वधारले. ट्रेडिंग दरम्यान त्याची किंमत १७५ डॉलरपर्यंत पोहोचली होती, जी बुधवारच्या बंद किंमतीपेक्षा १६५७ टक्के अधिक आहे.

स्मार्ट गुंतवणूक; मल्टी असेट श्रेणीत ‘या’ योजनेने दिला दमदार परतावा
सीएनएन (CNN)ने दिलेल्या माहितीनुसार, डिजिटल वर्ल्ड ऍक्विझिशन कॉर्प. (Digital World Acquisition Corp.) शेअर १०७ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. ट्रम्प यांनी बुधवारी रात्री घोषणा केली की, ट्रम्प मीडिया आणि टेक्नॉलॉजी ग्रुप एका स्पेशल पर्पज एक्विझिशन कंपनी (SPAC) द्वारे सूचीबद्ध केला जाणार आहे. डिजिटल वर्ल्ड एक्विझिशन कॉर्पोरेशनसह विलीन केले जात आहे. बुधवारी कंपनीचा शेअर ९.९६ डॉलरवर होता. गुरुवारी त्यामध्ये ४ पट वाढ झाली आणि शुक्रवारी सकाळी १३१.९० डॉलरवर पोहोचला. ट्रेडिंग दरम्यान त्याची किंमत १७५ डॉलरवर पोहोचली.

इंधन दर ; पाच दिवसांच्या दरवाढीनंतर पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला हा निर्णय
अनेक कंपन्या गेल्या दिवाळखोरीत
रेनेसान्स कॅपिटलचे वरिष्ठ आयपीओ मार्केट स्ट्रॅटेजिस्ट मॅट केनेडी म्हणाले की, ही असामान्य गोष्ट आहे. सहसा SPACच्या विलीनीकरणाच्या घोषणेमध्ये आर्थिक अंदाज आणि भांडवली रचना माहिती असते. पण या प्रकरणात फक्त एक प्रेस रिलिज आणि एक इन्वेस्टर प्रेझेंटेशन आहे. कंपनी किती गुंतवणूक करू शकते, याचा काहीही उल्लेख नाही. केनेडी म्हणाले की, ते मूलभूत तत्त्वांशी पूर्णपणे जोडलेले नाही. या स्टॉकची फ्लोअर प्राईस १० डॉलर असावी.

आयटी क्षेत्रात गुंतवणूक संधी; बिर्ला म्युच्युअल फंडाचा ‘निफ्टी आयटी ईटीएफ’ खुला
ट्रम्प यांचे अनेक व्यवसाय दिवाळखोरीत निघाले आहेत. ट्रम्प यांनी चार व्यवसायांच्या दिवाळखोरीसाठी (बँकरप्सी)साठी अर्ज केला आहे. हे सर्व व्यवसाय कॅसिनोशी जोडलेले आहेत. अटलांटिक सिटीमध्ये त्यांचा हा व्यवसाय होता. याआधी ट्रम्प यांचा आयपीओ १९९५ मध्ये आला होता, जेव्हा त्यांनी ट्रम्प हॉटेल्स आणि कॅसिनो रिसॉर्ट्स सार्वजनिक केले होते. या कॅसिनो कंपनीचे वर्षानुवर्षे नुकसान होत गेले आणि नंतर कंपनी दिवाळखोरीत गेली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: