T20 World Cup: पुढच्या सर्व लढती करो वा मरो, टीम इंडियात मोठे बदल; पाहा कोणाला मिळू शकतो डच्चू


दुबई: पाकिस्तानविरुद्ध झालेल्या १० विकेटच्या पराभवामुळे भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताची ही पहिली लढत असली आणि अद्याप ४ लढती शिल्लक असल्या तरी सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला पुढील सर्व सामन्यात विजय मिळवण्याची गरज आहे. काल पाकिस्तानविरुद्धच्या पराभवामुळे भारताला संघ निवडीवर आणखी लक्ष्य द्यावे लागणार आहे.

वाचा- पराभवाचा झटक्यानंतर टीम इंडियाचे टेन्शन वाढले; हा खेळाडू रुग्णालयात

भारतीय संघाची पुढील मॅच ३१ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. ही लढत देखील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात संघात बदल कोणता करावा यासाठी भारताकडे सहा दिवसांचा वेळ आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाने भारताला पुढील चार सामन्यात विजय मिळवावा लागेल. कारण ग्रुप बी मधील अन्य संघ असलेल्या अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध विजय मिळून भारत सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता फार कमी आहे. यासाठी भारताला अन्य संघांच्या निकालावर अवलंबून रहावे लागले.

वाचा-पाकिस्तानने बिघडवलं भारताचं गणित; उपांत्य फेरी गाठणे अवघड

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचे दोन्ही सलामीवीर अपयशी ठरले. पण या दोन्ही सलामीवीरांचा अनुभव आणि कामगिरी लक्षात घेता त्यात कोणताही बदल होईल असे वाटत नाही. कर्णधार विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केल्यामुळे भारताला १५१ पर्यंत मजल मारता आली. त्यामुळे पहिल्या ३ फलंदाजांमध्ये बदल होईल असे वाटत नाही. चौथ्या क्रमांकावर आलेल्या सूर्यकुमार यादव धावा करण्यात अपयशी ठरतोय. आयपीएलमध्ये देखील त्याला फार चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे पुढील सामन्यात सूर्यकुमारच्या जागी इशान किशनचा समावेश केला जाऊ शकतो.

वाचा- हा तर इस्लामचा हिंदूंवरील विजय; पाकिस्तान गृहमंत्र्यांचे द्वेष पसरवणारे वक्तव्य

विकेटकिपर म्हणून पंत स्थान कायम असेल. त्यानंतर ऑलराउंडर म्हणून संघात असलेला हार्दिक पंड्याच्या जागी शार्दूल ठाकूरचा समावेश केला जाऊ शकतो. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दिकला फक्त ११ धावा करता आल्या. हार्दिक गोलंदाजी देखील करत नाही. पाकविरुद्ध फलंदाजी करताना त्याला दुखापत देखील झाली. अशा परिस्थितीत न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हार्दिकच्या जागी शार्दूलचा समावेश होऊ शकतो.

वाचा- पाकिस्तानी पत्रकाराचा प्रश्न ऐकून, विराटच्या तळपायाची आग मस्तकात गेली; पाहा Video

गोलंदाजीत भारताने फिरकीपटू म्हणून रविंद्र जडेजा सोबत युवा खेळाडू वरुण चक्रवर्तीला संधी दिली होती. बदल करायचा झाला तर चक्रवर्तीच्या जागी अनुभवी आर अश्विनचा समावेश केला जाऊ शकतो. पाकिस्तानविरुद्ध या दोघांना काही खास कामगिरी करता आली नाही. तरी त्यांना दुसरी संधी दिली जाऊ शकते. जलद गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या तिघांवर भारतीय संघाची सर्व मदार असेल.

दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाचे संभाव्य बदल

> सूर्यकुमार यादवच्या जागी इशान किशन
> हार्दिक पंड्याच्या जागी शार्दूल ठाकूर
> वरुण चक्रवर्तीच्या जागी आर अश्विन

भारताच्या लढती
> भारत विरुद्ध न्यूझीलंड, ३१ ऑक्टोबर, संध्याकाळी ७.३० वाजता, दुबई
> भारत विरुद्ध अफगाणिस्तान, ०३ नोव्हेंबर, संध्याकाळी ७.३० वाजता, अबुधाबी
> भारत विरुद्ध स्कॉटलंड, ०५ नोव्हेंबर, संध्याकाळी ७.३० वाजता, दुबई
> भारत विरुद्ध नामिबिया, ०८ नोव्हेंबर, संध्याकाळी ७.३० वाजता, दुबई



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: