हायलाइट्स:
- नवाब मलिक-समीर वानखेडे वाद पेटला
- नवाब मलिक यांनी केले वानखेडेंच्या पहिल्या लग्नातील फोटो व्हायरल
- समीर वानखेडे यांनी दिला कायदेशीर कारवाईचा इशारा
मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. ‘माझ्याशी संबंधित खोटी कागदपत्रे व्हायरल केली जात आहेत. या प्रकाराला मी कायदेशीर आव्हान देणार आहे. माझ्या मूळ गावी जाऊन याची शहानिशा करता येऊ शकते. माझ्या नावानं जो जन्मदाखला सोशल मीडियावर व्हायरल केला जातोय, तो खोटा आहे. माझ्या विरोधात खोडसाळ प्रकार सुरू आहे. या सगळ्या प्रकाराला मी कायदेशीर आव्हान देणार आहे,’ असा इशारा वानखेडे यांनी दिला आहे.
वाचा: समीर दाऊद वानखेडे… नवाब मलिक यांचा आणखी एक खळबळजनक आरोप
‘नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नातील फोटोही शेअर केला आहे. सोबत ‘पेहचान कौन?’ असं म्हटलं आहे. त्यावरही वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘२००६ मध्ये माझं लग्न झालं होतं. त्यानंतर कायदेशीररित्या घटस्फोट घेऊन मी दुसरं लग्न केलं. पण आता पहिल्या लग्नातले फोटो शेअर करून माझ्या कुटुंबावर हल्ला केला जातोय. ड्रग्ज प्रकरण एनसीबीकडून सुरू असलेला तपास भरकटवण्याचा हा प्रकार आहे. अतिशय खालच्या दर्जाचं राजकारण सुरू आहे,’ असं वानखेडे यांनी म्हटलं आहे.
कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टीवरील कारवाईपासून नवाब मलिक यांनी एनसीबी व समीर वानखेडे यांना लक्ष्य केलं आहे. एनसीबी आणि समीर वानखेडे हे भाजप नेत्यांच्या सांगण्यावरून बॉलिवूडला त्रास देत असल्याचा मलिक यांचा आरोप आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी हे सगळं सुरू आहे. वानखेडे हे मीडियाला आधीच माहिती देऊन छाप्यांची कारवाई करतात. हव्या त्या बातम्या पेरून एखाद्या व्यक्तीची बदनामी करतात. त्यानंतर त्यांच्याकडून वसुली केली जाते, असा आरोप मलिक यांनी केला आहे. वानखेडे यांनी केलेल्या काही कारवायांमधील साक्षीदार कसे बनावट आणि मर्जीतले असतात, याबाबत मलिक यांनी काही दिवसांपूर्वी गौप्यस्फोट केला होता. वानखेडे यांना तुरुंगात टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही मलिक यांनी दिला आहे.
वाचा: अनन्या पांडेच्या मागे चौकशीचं शुक्लकाष्ठ; NCB ने तिसऱ्यांदा बजावलं समन्स