Video: हा तर इस्लामचा हिंदूंवरील विजय; पाकिस्तान गृहमंत्र्यांचे द्वेष पसरवणारे वक्तव्य


इस्लामाबाद: आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये रविवारी झालेल्या ग्रुप बी मधील पहिल्या लढतीत पाकिस्तानने भारताचा १० विकेटनी पराभव केला. पाकिस्तानने वर्ल्डकपच्या इतिहासात प्रथमच भारताचा पराभव केलाय. पाकिस्तानसाठी हा विजय ऐतिहासिक ठरल्याने देशात जल्लोषाचे वातावरण आहे. या पहिल्या विजयानंतर भारतातील चाहते निराश झाले आहे तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानमध्ये चाहते प्रचंड आनंदी झाले आहेत. अशाच पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी जणू युद्ध जिंकल्यासारखे द्वेष पसरवणारे वक्तव्य केले आहे.

वाचा- पाकिस्तानी पत्रकाराचा प्रश्न ऐकून, विराटच्या तळपायाची आग मस्तकात गेली; पाहा Video

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियवर झालेल्या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने १५१ धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानने विजयाचे लक्ष्य एकही गडी न गमावता पार केले. या विजयानंतर पाकिस्तानचे गृहमंत्री शेख राशीद यांनी सोशल मीडियावर एक व्हिडियो पोस्ट केला आहे. यात त्यांनी द्वेष पसरवणारे वक्तव्य केले आहे.

वाचा- Video : रिस्पेक्ट! इतिहास रचल्यानंतर धोनीपुढे हाथ बांधून उभे राहिले पाकिस्तानी खेळाडू

काय म्हणाले शेख रशीद

मला वाईट वाटते की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिली मॅच होती जी देशासाठीच्या जबाबदाऱ्यांमुळे मला स्टेडियममध्ये जाऊन पाहता आली नाही. पण मी इस्लामाबाद, रावळपिंडी मार्गावरील सर्व कंटेनर्स हटवण्याचे आदेश दिले आहेत. जेणे करुन देशातील नागरिक या विजयाचा आनंद साजरा करू शकतील. सध्या पाकिस्तानात कंट्टरपंथीय टीएलपीच्या समर्थकांनी घातलेल्या राड्यामुळे इस्लामाबादकडे मार्ग बंद करण्यात आले आहेत.

शेख राशीद पुढे म्हणाले, पाकिस्तानी जनतेला या विजयाबद्दल अभिनंदन, आज आपली फायनल मॅच होती. जगातील मुसलमान आणि भारतातील मुसलमानांच्या शुभेच्छा पाकिस्तान संघासोबत होत्या. जगातील सर्व इस्लामी जनतेचा हा विजय आहे. पाकिस्तान झिंदाबाद…इस्लाम झिंदाबाद!Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: