Fuel Price: ‘लसीकरणाची शंभरी झाली, आता इंधनांची शंभरीही साजरी करा’


हायलाइट्स:

  • पेट्रोलची किंमत लीटरमागे १०० रुपयांच्या पुढे
  • डिझेलच्या किंमतीनंही १०० रुपयांचा टप्पा ओलांडला
  • गॅस सिलिंडरच्या किंमती १००० रुपयांच्या पुढे

नवी दिल्ली : भारतात लसीकरणाचा शंभर कोटींचा आकडा गाठल्यानंतर केंद्रातील सत्ताधारी भाजपकडून याचा मोठा गवगवा करण्यात आला. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सोहळ्यात सहभागी होत ही देशासाठी उल्लेखनीय गोष्ट असल्याचं नमूद केलं. यानंतर, विरोधकांनी मात्र मोदी सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवलाय. ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लसीकरणाची शंभरी साजरी केली त्याच पद्धतीनं त्यांनी इंधनांची शंभरीही साजरी करावी, असा टोला माजी केंद्रीय अर्थमंत्री चिदंबरम यांनी लगावलाय.

इंधन किंमतींची सेन्चुरी

‘पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळानं १०० कोटी लसीकरणाचा टप्पा साजरा केला. त्यांनी इतरही शंभरी साजरी करून नवा आदर्श समोर ठेवायला हवा. काही आठवड्यांपूर्वीच लीटरमागे पेट्रोलच्या किंमती १०० रुपयांच्या पुढे गेल्या आहेत आणि आता डिझेलच्या किंमतीनं लीटरमागे १०० रुपयांचा टप्पा गाठलाय’, अशी खरमरीत टीका पी चिदंबरम यांनी केलीय.

covid vaccination drive : ‘करोनावरील लसीकरण मोहीमेचे यश हे आरोग्य कर्मचारी आणि जनतेचे’
अंबानी-आरएसएस संबंधित व्यक्तींकडून ३०० कोटींची लाच, सत्यपाल मलिक यांचा गौप्यस्फोट

गॅस सिलिंडरच्या किंमती १००० रुपयांच्या पुढे
‘सेलिब्रेशनसाठी आणखी एक संधी आणि निमित्त आहे. कारण, गॅस सिलिंडरच्या किंमती आता १००० रुपयांचा टप्पा ओलांडलाय’, असंही ट्विट चिदंबरम यांनी केलंय.

करोना लसीकरण मोहिमेत २२ ऑक्टोबर रोजी भारतानं देशभरात १०० कोटी लसींचे डोस पूर्ण केले. हा टप्पा गाठण्यासाठी भारताला २७८ दिवस लागले. लसीकरणाच्या बाबतीत भारत आता केवळ चीनच्या मागे आहे. चीन इतर देशांच्या तुलनेत खूप पुढे निघून गेला आहे. भारतामागोमाग अमेरिका, रशिया आणि ब्रिटनचा क्रमांक लागतो.

भारतानं लसीकरणाचा गाठलेला टप्पा हा भारतीयांच्या सामूहिक भावनेचा विजय असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं.

Madhay Pradesh: अभिनेता बॉबी देओलला धुंडाळत बजरंग दलाचा ‘आश्रम’च्या सेटवर हल्ला
Supreme Court: ‘आठ लाख उत्पन्नाचा आकडा कुठून? निकष सांगा, अन्यथा आरक्षण रोखू’Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: