पाकिस्तानी पत्रकाराचा प्रश्न ऐकून, विराटच्या तळपायाची आग मस्तकात गेली; पाहा Video


दुबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने टी-२० विश्वचषक मोहिमेची सुरवात केली, पण पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार विराट कोहलीला पाकिस्तानी पत्रकाराने एक अजब गजब प्रश्न विचारला. त्यावर विराटने दिलेल्या उत्तराची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.

विराटला पत्रकार परिषदेत पहिल्यांदाच असा अनुभव आला असेल. पाकिस्तानी पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर विराटला धक्का बसला आणि त्याने आपले तोंडच झाकून घेतले. रोहित शर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्याबाबत त्या पत्रकाराने प्रश्न विचारला होता.

पाकिस्तानी पत्रकाराने विराटला प्रश्न विचारला की, त्याने रोहित शर्माला संघातून वगळून ईशान किशनला घेण्याचा विचार केला आहे का? इशानने सराव सामन्यात चांगली कामगिरी केली होती, त्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये का स्थान दिले नाही.

हा प्रश्न ऐकल्यानंतर विराट कोहली आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला की, “हा एक अतिशय धाडसी प्रश्न आहे.” यानंतर विराटने त्या पत्रकारालाच संघ निवडीबाबत त्याचे मत विचारले. तुम्हाला जर वाद निर्माण करायचा असेल, तर आधीच सांगा म्हणजे मी त्याचं उत्तर देईल, असंही कोहलीनं यावेळी स्पष्ट केलं.

विराट म्हणाला, ‘हा खूप धाडसी प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं सर? तुमच्या मते संघ काय असायला हवा होता? मी त्या संघासोबत गेलो, जे माझ्या मते सर्वोत्तम होते. तुमचे मत काय आहे? तुम्ही रोहित शर्माला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून वगळले असते का? तुम्ही रोहितला संघातून बाहेर केलं असतं का? गेल्या सामन्यात त्याने काय कामगिरी केली माहित आहे ना? मला सांगा? अविश्वसनीय. जर तुम्हाला वाद निर्माण करायचे असतील, तर आधी मला सांगा, जेणेकरून मी त्यानुसार तयारी करू शकेन.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याला शाहीन शाह आफ्रिदीने पहिल्याच चेंडूवर पायचित केलं. आफ्रिदीने टाकलेला यॉर्कर रोहित खेळू शकला नाही. आणि पहिल्याच चेंडूवर त्याला पायचित होऊन माघारी परतावं लागलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात त्याने ४१ चेंडूत ६० धावा केल्या. ईशान किशनही चांगल्या फॉर्ममध्ये आहे, पण तो रोहितची जागा घेऊ शकेल का? हा मोठा प्रश्न आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: