…म्हणून मोदी सरकार पेट्रोलचे दर कमी करणार नाही : पृथ्वीराज चव्हाण


हायलाइट्स:

  • पृथ्वीराज चव्हाण यांची मोदी सरकारवर टीका
  • केंद्र सरकार दर कमी करणार नसल्याचा दावा
  • लसीकरणाच्या इव्हेंटवरूनही साधला निशाणा

कोल्हापूर : देशात सध्या पेट्रोल-डिझेलच्या दरांचा प्रश्न चर्चेत आहे. याच मुद्द्यावरून आता काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Congress Prithviraj Chavan) यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. तसंच केंद्र सरकार हे दर कमी करणार नसल्याचंही म्हटलं आहे.

‘केंद्राने पेट्रोलवरील कर कमी केल्यास राज्य सरकारही त्यावरील कर कमी करेल, त्यामुळे पेट्रोलचे दर कमी होऊ शकतात. मात्र सध्या पेट्रोलचे कर हेच केंद्राच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत झाले आहे. त्यावरच सध्या पगारापासून ते विकास कामापर्यंत सर्वकाही खर्च भागवला जात आहे. यामुळे सध्याची भारताची हालाखीची आर्थिक परिस्थिती पाहता पेट्रोलचे कर कमी करतील अशी शक्यता वाटत नाही,’ असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

साक्षीदारांकडून कोऱ्या कागदावर सह्या?; समीर वानखेडे म्हणतात…

लसीकरणाच्या इव्हेंटवरूनही साधला निशाणा

‘लसीकरण हा इव्हेंट कधी नाही, ती प्रक्रिया आहे. केंद्राची ती जबाबदारी आहे आणि नागरिकांचा तो हक्क आहे, त्यामुळे लसीकरणाच्या प्रत्येक टप्प्यात जाहिरातबाजी कशासाठी केली जात आहे?’ असा सवालही चव्हाण यांनी कोल्हापुरात केला आहे.

nawab malik sameer wankhede : समीर वानखेडेंवर नवाब मलिकांचे गंभीर आरोप; गृहमंत्र्यांना भेटणार, केली मोठी मागणी

कोल्हापुरात आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, १०० कोटी लोकांना लस दिल्याची सध्या जाहिरातबाजी सुरू आहे. पण देशात फक्त 30 कोटी लोकांना लशीचे दोन्ही डोस दिलेले आहेत. हे प्रमाण देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत केवळ २१ टक्के आहे. जगाच्या तुलनेत लस देण्यात भारत १४४ व्या क्रमांकावर आहे. म्हणजे आपण लसीकरणात किती मागे आहोत हे लक्षात येईल. तरीही लसीबाबत जी जाहिरातबाजी सुरू आहे ती पूर्णपणे चुकीची आहे.

चव्हाण म्हणाले, प्रत्येक गोष्टीत इव्हेंट करण्याचा मोदी यांनी धडाकाच लावला आहे. त्यांच्या वाढदिवसादिवशी विक्रम करायचा म्हणून तत्पूर्वी चार दिवस लसीकरण बंद ठेवण्यात आले. वाढदिवसादिवशी ज्यादा लसीकरण केले. मुळात ही लस केंद्राने स्वतः विकत घेणे आवश्यक होते. पण अनावश्यक स्पर्धा केल्यामुळे लसीचा दर वाढला. खाजगी कंपन्यांना फायदा मिळावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा डाव केल्याचा आरोपही त्यांनी केला. लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर स्वतःचा फोटो छापणारे मोदी हे जगातील एकमेव पंतप्रधान असल्याचा टोलाही त्यांनी मारला. किती व्यक्ती स्तोम माजवायचा? प्रत्येक गोष्ट किती इव्हेंट म्हणून साजरी करायची याला काही प्रमाण आहे का? असा सवालही त्यांनी केला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: