covid 19 india : खबरदारी घ्या! नवा वेरियंट डेल्टा पेक्षाही अधिक घातक, भारतात आढळले ७ रुग्ण


नवी दिल्लीः संपूर्ण जग करोना संसर्गाचा सामना गेल्या दीड वर्षांहून अधिक काळापासून करत आहे. आतता करोनाचे डेल्टा वेरियंटमधील नवीन म्युंटट म्हणजे नवा प्रकार समोर आला आहे. करोनाचा हा नवा वेरियंट अधिक संसर्गजन्य आणि घातक असल्याचं बोललं जातंय. ब्रिटनमध्ये करोनाच्या या नव्या वेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. यानंतर या नव्या वेरियंटचे परीक्षण आणि मूल्यांकन केले जात होते. आता या डेल्टा प्रकारातील नवा वेरियंटचे भारतातही रुग्ण आढळून आले आहेत. हा वेरियंट डेल्टा पेक्षाही अधिक घातक आहे. पण याचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या अतिशय कमी आहे..

नॅशनल रोग नियंत्रण केंद्राने (NCDC) हा अहवाल जाहीर केला आहे. करोनाच्या डेल्टा व्हेरियंटच्या नवीन म्युटंटची रुग्ण इंदूरमध्ये आढळली आहेत. जो डेल्टा प्रकारापेक्षा अधिक धोकादायक आहे. यापैकी दोन रुग्ण हे महू छावणीत तैनात असलेले लष्करी अधिकारी आहेत. सप्टेंबरमध्ये त्यांचे नमुने घेण्यात आले होते, अशी माहिती इंदूरचे मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. सैत्या यांनी दिली.

INSACOG नेटवर्कचे शास्त्रज्ञ SARS-CoV-2 च्या व्हेरियशनवर निरीक्षण करत आहेत. AY.4.2 शी संबंधित निष्कर्षांमध्ये अजूनही उच्च पातळीवर अनिश्चितता आहे आणि या प्रकारामध्ये संसर्ग किंवा मृत्यूचा धोका जास्त आहे, असं म्हणणं फार घाईचं आहे. नवीन वेरियंटने चिंता वाढवली असताना करोना संसर्ग संपलेला नाही, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.

‘करोनावरील लसीकरण मोहीमेचे यश हे आरोग्य कर्मचारी आणि जनतेचे’

आपल्या डेटाबेसमध्ये आतापर्यंत AY.4.2 ची १० पेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे, अशी माहिती यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने दिली आहे. ब्रिटनमध्ये VUI-21OCT-01 ची ५,१२० रुग्णांची नोंद झाली आहे. या वेरियंटलाच AY.4.2 म्हटले जाते. या वेरियंटमधील पहिला रुग्ण जुलैमध्ये आढळला होता.

covid vaccination doses : ‘आळशी कुठले’, करोना लसीचा दुसरा डोस न घेणाऱ्यांना अदर पुनावालांनी दिला ‘डोस’

AY.4.2 नावाचा हा सब वेरियंट मूळ डेल्टापेक्षा १० ते १५ टक्के अधिक संसर्गजन्य असल्याचं नोंदवलं गेलं आहे. मात्र, सध्या तो मोठ्या प्रमाणावर पसरण्याची शक्यता कमी असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या वेरियंटची आणखी मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळल्यास त्याची नोदं सब वेरियंट जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) ‘वेरियंट ऑफ इंटरेस्ट’मध्ये समावेश होऊ शकतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: