covid vaccination drive : ‘करोनावरील लसीकरण मोहीमेचे यश हे आरोग्य कर्मचारी आणि जनतेचे’


नवी दिल्लीः देशात करोना संसर्गाचा नायनाट करण्यासाठी लसीकरण मोहीम ( covid vaccination drive ) राबवण्यात येत आहे. आतापर्यंत देशात १०० कोटींहून अधिक नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. हे ध्येय गाठून देशाने इतिहास रचला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमात लसीकरण मोहिमेच्या यशाबद्दल आरोग्य कर्मचारी आणि जनतेचे अभिनंदन केले.

देश नव्या उत्साहाने, नव्या ऊर्जेने पुढे जातोयः पंतप्रधान मोदी

करोनावरील लसीकरण मोहीमेत १०० कोटी डोस दिल्यानंतर देश नवीन उत्साह, नवीन उर्जा घेऊन पुढे जात आहे. हे लसीकरण मोहीमेचे यश आणि भारताचे सामर्थ्य दर्शवते. देशाच्या आणि जनतेच्या क्षमतेची आपल्याला चांगली जाणीव आहे. आपले आरोग्यसेवक देशवासियांना लसीकरण करण्यात कोणतीही कसर सोडणार नाहीत, हे मी जाणून होतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

‘सर्वांसाठी लस-मोफत लस’ मोहिमेला नवी उंची मिळाली’

पीएम मोदी म्हणाले, “लाखो आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळेच भारत १०० कोटी लसीच्या डोसचा टप्पा पार करू शकला आहे. आज मी त्या प्रत्येक भारतीयाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो ज्याने सर्वांसाठी ‘लसमुक्त लस’ मोहिमेला इतकी उंची, यश मिळवून दिले.

“येत्या रविवारी, ३१ ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. ‘मन की बात’च्या प्रत्येक श्रोत्याच्या वतीने लोहपुरुषाला नमन करतो. आपण आपल्या संयुक्त उद्यमानेच देशाला नवीन मोठ्या उंचीवर नेऊ शकतो. जर आपल्यामध्ये एकता नसेल तर आपण स्वतःला नवीन संकटांमध्ये अडकवू. म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता असेल, तरच नवी उंची गाठली जाईल आणि विकास होईल. स्वातंत्र्यसाठी केलेली लढाई हे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे, असं ते म्हणाले.

Parliament Session: मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडे पुढच्या महिन्यात आयती संधी?

“भारताने नेहमीच जागतिक शांततेसाठी काम केले आहे. भारत १९५० पासून सतत संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांचा एक भाग आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. भारत गरिबी, हवामान बदल आणि कामगारांशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यातही आघाडीची भूमिका बजावत आहे. पोलिस आणि विकास संस्थांमध्ये फक्त पुरुषांची मक्तेदारी होती. पण गेल्या काही वर्षांमध्ये महिला पोलिसांची संख्या दुप्पट झाली आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

अंबानी-आरएसएस संबंधित व्यक्तींकडून ३०० कोटींची लाच, सत्यपाल मलिक यांचा गौप्यस्फोट



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: