भारतीय संघाला झोपेच्या गोळ्या द्या, तरच तुम्ही जिंकाल; दिग्गज खेळाडूचा पाकला सल्ला


दुबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० वर्ल्डकपमधील लढत काही तासात सुरू होणार आहे. या लढतीची प्रतिक्षा दोन्ही देशांतील चाहत्यांप्रमाणेच जगातील अन्य क्रिकेट चाहत्यांना आहे. या सामन्याबद्दल दोन्ही देशातील माजी खेळाडू त्यांची मते आणि अंदाज व्यक्त करत आहेत. अशाच पाकिस्तानच्या एका माजी खेळाडूंना भारताविरुद्धच्या लढतीत कसा विजय मिळवायचा याचे ३ मार्ग सांगितले आहेत.

वाचा- Video : धोनी आणि राहुलला मॅच हरण्याची ऑफर; संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

टी-२० आणि वनडे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला कधीच भारताविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही. टी-२० वर्ल्डकपमध्ये २००७ पासून आतापर्यंत झालेल्या सर्व लढतीत भारताने विजय मिळवला आहे. या वर्षी कोण बाजी मारेल असा प्रश्न पाकिस्तानच्या माजी जलद गोलंदाज शोएब अख्तरला विचारण्यात आला त्यावर त्याने दिलेले उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा- Video:पाकिस्तानविरुद्धच्या लढती आधी विराट संतापला; एका रात्रीत पर्याय तयार होत नाही

एका कार्यक्रमात बोलताना शोएब म्हणाला, पाकिस्तानला जर आजच्या सामन्यात भारताचा पराभव करायचा असेल तर या तीन गोष्टी कराव्या लागतली. पहिली म्हणजे भारतीय संघाला झोपेच्या गोळ्या द्या, दुसरी विराट कोहलीला इंस्टाग्रामवर रोखून ठेवा आणि महेंद्र सिंह धोनीला सांगावे लागले की तु खेळण्यासाठी येऊ नको.

वाचा-IND vs PAK: आज पराभव झाल्यास काय होईल; टी-२० वर्ल्डपकमधील आव्हान संपुष्टात येईल का?

शोएब अख्तरने गंमतीने असे उत्तर दिले असले तरी, त्याने पाकिस्तानला स्ट्राइक रेट चांगला ठेवण्याचा सल्ला दिला. त्याच बरोबर सलामीच्या फलंदाजांना अधिक धावा कराव्या लागतली. जर चांगली धावसंख्या उभी केली तर गोलंदाजांना संधी मिळेल. या शोमध्ये भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग देखील होता. त्याने सुरुवात चांगली करावी लागले असे सांगितले. भारताने स्वत:चा गेम खेळल्यास गोष्टी सोप्या होतील. कोणत्याही प्रकारचे प्रेशर घेण्याची गरज नाही.

वाचा- पाकिस्तानने संघ जाहीर केला; भारतीय संघात कोणाला संधी मिळणार? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

शोएब अख्तरने सोशल मीडियावरून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला एक मेसेज देखील पोस्ट केला आहे. अख्तरने बाबरला घबराना नही है! ही ओळ पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांची फेमस लाईन आहे, ज्यावर ती मीम्स तयार होत असतात.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: