Video:पाकिस्तानविरुद्धच्या लढती आधी विराट संतापला; एका रात्रीत पर्याय तयार होत नाही


दुबई: विराट कोहलीने वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टी-२० लढतीसाठी नेतृत्त्व सोडण्याचे जाहीर केल्यापासून त्याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यापूर्वी याबाबत प्रश्न विचारल्यावर कोहली संतापला. वाद उकरुन काढणाऱ्यांना मी काहीही मालमसाला देणार नाही, असे भारतीय कर्णधाराने सुनावले.

वाचा- टी-२० वर्ल्डकप: भारतीय संघाचे वेळापत्रक अपडेट झाले; अखेरच्या लढती कोणाविरुद्ध पाहा

कोहलीने टी-२० कर्णधारपद सोडल्यावर अनेकांना धक्का बसला होता. त्यानंतर यामागची कारणे काय असतील, याची खूप चर्चा झाली. ‘नेतृत्त्व सोडण्याचे स्पष्टीकरण मी दिले होते. आता त्याबाबत जास्त काही बोलण्याची मला गरज वाटत नाही. आमचे पूर्ण लक्ष टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेवर केंद्रित झाले आहे. या स्पर्धेत संघ म्हणून सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आम्ही तयारी करीत आहोत; पण काही जण जे आस्तित्वातही नाही ते खणून काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्या सर्वांना कोणताही मालमसाला देण्यास मी तयार नाही,’ असे चिडलेल्या कोहलीने सांगितले.

वाचा- पाकिस्तानने संघ जाहीर केला; भारतीय संघात कोणाला संधी मिळणार? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

कर्णधारपद सोडण्याचे कारण मी प्रामाणिकपणे सांगितले होते. त्या वेळी काहीही लपवून ठेवले नव्हते. मी त्या वेळी काही दडवून ठेवले असे ज्या कोणाला वाटत असेल, त्यांची मला कीव येते. मी काहीही लपवून ठेवलेले नाही, असेही कोहलीने सुनावले.

वाचा- IND vs PAK: भारताच्या या फलंदाजाला बाद करण्याचा दम पाक गोलंदाजांमध्ये नाही

हार्दिकचे महत्त्व संघ जाणतो

‘हार्दिक पंड्या आमच्यासाठी सहाव्या क्रमांकावरील खूपच मोलाचा फलंदाज आहे. त्याच्याऐवजी पर्यायी खेळाडू एका रात्रीत सापडणार नाही. त्याने गोलंदाजी केली नाही, तरीही त्याच्या अंतिम संघातील स्थानाबद्दल कोणतीही चर्चा होण्याचा प्रश्नच नाही,’ असे विराट कोहलीने स्पष्ट केले. हार्दिकच्या पाठीवर २०१९ मध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. तेंव्हापासून त्याने क्वचितच गोलंदाजी केली आहे. त्यामुळे त्याच्या अंतिम संघातील स्थानाबद्दल शंका घेतली जात होती. मात्र, तो केवळ फलंदाज म्हणूनही संघात येऊ शकतो असे सांगत कोहलीने या चर्चेस पूर्णविराम दिला.

वाचा- IND vs PAK: …तर बसू शकतो भारताला पराभवाचा धक्का, पाकच्या या खेळाडूंपासून धोका

हार्दिकच्या तंदुरुस्तीत सुधारणा होत आहे. तो आवश्यकता भासल्यास दोन षटके गोलंदाजी करू शकेल, असे कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या लढतीपूर्वी सांगितले. सराव सामन्यात कोहलीने दोन षटके गोलंदाजी केली होती. याचीच जणू आठवण करुन देत कोहली म्हणाला, ‘आवश्यकता भासल्यास आमच्याकडे पर्याय आहेत. तो गोलंदाजी सुरू करेपर्यंत आम्ही उपलब्ध अनेक पर्यांयाचा पुरेपूर उपयोग करु शकतो. गरज भासल्यास एखाद दोन षटके कोण टाकणार, या पर्यायांचा विचार आम्ही केला आहे.’

तो निर्णय कोहलीचाच

‘टी-२० कर्णधारपद सोडण्याचा कोहलीचा निर्णय ऐकून मला धक्का बसला होता. त्याने हा निर्णय इंग्लंड दौऱ्याची सांगता झाल्यानंतरच घेतला होता. तो पूर्णपणे त्याचा होता. आम्ही त्याच्यावर कोणताही दबाव आणला नव्हता. आम्ही त्याला काहीही सांगितले नव्हते,’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी सांगितले. ‘बीसीसीआय यासारखे काहीही करीत नाही. मी स्वतः खेळाडू होतो, त्यामुळे मी सर्व जाणतो. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये दीर्घ काळ नेतृत्त्व करणे सोपे नसते. मी सहा वर्षे कर्णधार होतो. कर्णधाराला मिळणारा मान सर्वांना दिसतो; पण त्याच्या आत काय सुरू असते, हे कोणाला समजत नाही. त्याला आतल्या आत खूप त्रास होत असतो. हे सर्वच कर्णधारांबद्दल घडते. केवळ तेंडुलकर, गांगुली, धोनी किंवा कोहलीबाबतच नाही, तर सर्वांबद्दलच. कर्णधारपद ही खूपच खडतर जबाबदारी आहे,’ असेही ते म्हणाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: