साक्षीदारांकडून कोऱ्या कागदावर सह्या?; समीर वानखेडे म्हणतात…


हायलाइट्स:

  • आर्यन खान प्रकरणात मोठा गौप्यस्फोट
  • के.पी गोसावीच्या बॉडिगार्डचा खळबळजनक दावा
  • समीर वानखेडेंनी दिली प्रतिक्रिया

मुंबईः कोर्डिलिया क्रूझ अमली पदार्थ प्रकरणानं आता धक्कादायक वळण घेतलं आहे. ड्रग्ज क्रुझ प्रकरणातील फरार साक्षीदार के.पी गोसावीच्या (K.P. Gosavi) बॉडिगार्डनं या प्रकरणात धक्कादायक खुलासा करत एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत.

के. सी गोसावी याचा बॉडिगार्ज प्रभाकर साईल यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधत आरोप केले होते.समीर वानखेडेंची आपल्याला भीती वाटतेय, असा व्हिडिओ जारी करुन प्रभाकर साईल यांनी दावा केला आहे. समीर वानखेडे यांच्यावर थेट आरोप केल्यामुळं या प्रकरणानं वेगळं वळण घेतलं आहे. या सर्व प्रकरणावर समीर वानखेडे यांनी दोन वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.

वाचाः आर्यन खान प्रकरणात कोट्यवधींची डील? खळबळजनक व्हिडिओतून दावा

प्रभाकर साईल यांने केलेल्या आरोपांवर समीर वानखेडे यांनी प्रत्युत्तर देत योग्य वेळी उत्तर देईन, असं म्हटलं आहे. वेळ आल्यानंतर प्रभाकर साईलने केलेल्या आरोपांवर उत्तर देईन, असं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.

वाचाः आर्यन खान प्रकरणात साक्षीदारांच्या कोऱ्या कागदावर सह्या; संजय राऊत म्हणाले…

प्रभाकर साईल यांचे आरोप काय?

समीर वानखेडे यांनी पंचनाम्यावर साक्षीदार म्हणून आपली सही कोऱ्या कागदांवर घेतली गेली. नऊ ते दहा कागदांवर आपल्या सह्या घेतल्या गेल्या. आपल्याकडून आधार कार्ड मागितल्यावर. पण ओरिजनल आधारकार्ड नसल्याने समीर वानखेडेंनी त्यांचा नंबर दिला आणि आपण आधार कार्ड व्हॉट्सअॅप केलं. त्यावेळी रात्री अडीच पावणे तीन वाजता आम्ही एनसीबीच्या कार्यालयातून खाली उतरलो. त्यावेळी किरण गोसावीना सॅम नावाच्या एका व्यक्तीचा फोन आला. एनसीबी ऑफिसपासून ५०० मीटर अंतरावर एका डाव्याबाजूला त्यांची मिटींग झाली. मिटींगमध्ये त्यांची काहीतरी डील झाली, असं साईल यांनी आपल्या आरोपांत म्हटलं आहे.

वाचाः चित्रा वाघ यांचे समीर वानखेडे, क्रांती रेडकर यांना समर्थनSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: