IND vs PAK: …तर बसू शकतो भारताला पराभवाचा धक्का, पाकच्या या खेळाडूंपासून धोका


दुबई: क्रिकेटमधील भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी संघ आज, रविवारी, टी-२० क्रिकेट वर्ल्ड कपमधील ‘सुपर-१२’मध्ये आमनेसामने येत असून, या निमित्ताने दिवाळीआधीच आतषबाजी बघायला मिळणार आहे. भारतीय संघ वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानकडून कधीही पराभूत झालेला नाही. ही विजयी मालिका कायम राखण्याचा प्रयत्न विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा असेल; तर, बाबर आझमच्या पाकिस्तान संघाचा प्रयत्न भारताला रोखून इतिहास लिहिण्याचा असेल. अर्थात, आजवरची कामगिरी पाहता दुबईतील या लढतीत भारताचेच पारडे जड मानले जात आहे.

वाचा- IND vs PAK: भारताच्या या फलंदाजाला बाद करण्याचा दम पाक गोलंदाजांमध्ये नाही

केवळ भारत व पाकमधील क्रिकेट रसिकांचेच नव्हे तर संपूर्ण क्रिकेट जगतातील सगळ्यांनाच वेध लागलेली भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी २० वर्ल्ड कप स्पर्धेतील लढत आज, रविवारी होत आहे. विराट कोहलीच्या संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धची विजयी मालिका कायम ठेवत दिवाळीच्या आनंदी वातावरणास सुरुवात करावी, अशीच भारतीय क्रिकेटप्रेमींची अपेक्षा आहे.

वाचा-पाकिस्तानने संघ जाहीर केला; भारतीय संघात कोणाला संधी मिळणार? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

कर्णधार म्हणाले…

संघाचे स्वरूप कसे असेल, याची आम्ही चर्चा केली आहे. मात्र, अंतिम संघ मी आत्ताच जाहीर करणार नाही. मात्र हा संघ समतोल असेल; तसेच योजनेची अंमलबजावणीही योग्य प्रकारे करू शकेल, याचा संघातील प्रत्येकास विश्वास आहे. अंतिम संघातील प्रत्येकास आपली जबाबदारी काय आहे, याची पुरेपूर जाणीव आहे. – विराट कोहली, भारतीय कर्णधार

वाचा- भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला फक्त काही तासांवर; कधी, कुठे आणि केव्हा पाहाल मॅच

लढत भारताविरुद्ध असल्याने आम्हाला अतिशय सावधतेने व संयमाने खेळावे लागेल. आमचे सर्वच खेळाडू चांगल्या लयीत आहेत. आम्ही या मैदानावर खूप सामने खेळलो आहोत. त्याचा आम्हाला निश्चित फायदा होईल. कारण येथील परिस्थितीची चांगली जाण आम्हाला आहे. – बाबर आझम, पाकिस्तानचा कर्णधार

वाचा- पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी सर्व टेन्शन गेले; भारताची प्लेइंग इलेव्हन तयार

दृष्टिक्षेप…

– विराट कोहली पाकिस्तानविरुद्ध टी-२० वर्ल्ड कपमध्ये एकदाही बाद झालेला नाही. त्याने मागील तीन लढतींत नाबाद ७८, नाबाद ३६ आणि नाबाद ५५ धावा केल्या आहेत.

– महंमद रिझवान (१४६२ धावा आणि १३३.४ स्ट्राइक रेट) आणि बाबर आझम (१३६३ धावा आणि १३४.७ स्ट्राइक रेट) हे २०२१मधील टी-२०तील सर्वाधिक धावा करणारे फलंदाज आहेत.

– वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला पराभूत करणे पाकिस्तानला एकदाही शक्य झालेले नाही.

भारत-

जमेच्या बाजू : भारताकडे फलंदाजीत अनेक पर्याय आहेत. संघात आक्रमक फलंदाजांचा भरणा असून, रोहित, राहुल, विराट, पंत, सूर्यकुमार चांगल्या फॉर्मात आहेत. जागतिक दर्जाचे गोलंदाज भारतीय संघात आहेत. शमी, बुमराह यांना चांगली लय सापडलेली आहे. जडेजा, शार्दूल, पंड्यासारखे अष्टपैलू संघात. फिरकी गोलंदाज फॉर्मात.

कमकुवत बाजू : हार्दिक पंड्या गोलंदाजी करीत नाही. त्यामुळे सहावा पर्याय शोधावा लागणार. मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात फलंदाजांकडून चुका होतात.

पाकिस्तान-

जमेच्या बाजू : फखर झमान, हैदर अली आणि बाबर आझम असे आक्रमक फलंदाज पाकिस्तानकडे आहेत. महंमद हफीझ आणि शोएब मलिकचा अनुभव मोलाचा ठरणार. शाहीन आफ्रिदी, हसन अली आणि हारिस रौफ यांच्याकडून अपेक्षा.

कमकुवत बाजू : न्यूझीलंड आणि इंग्लंडने पाक दौऱ्यातून माघार घेतल्याने वर्ल्ड कपपूर्वी पुरेसा सराव नाही. बेभरवशी संघ. भारताविरुद्ध दबावाची स्थिती हाताळण्यात पाक संघ कमकुवत. फिरकी गोलंदाज इमाद वसीम आणि शादाब खान खराब फॉर्मात.

आयसीसी टी-२० क्रमवारी

२ – भारत

३ – पाकिस्तान

आजवर आमनेसामने…

८ टी-२०

७ भारताचे विजय

१ पाकिस्तानचा विजय

टी-२० वर्ल्ड कपमधील कामगिरी

भारत – २००७ चा विजेता आणि २०१४चा उपविजेता

पाकिस्तान – २००९चा विजेता आणि २००७चा उपविजेता

लढतीचे रणांगण

स्थळ : दुबई इंटरनॅशनल स्टेडियम, दुबई

वेळ : आज सायंकाळी ७.३० पासूनSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: