तुर्कीचा मोठा निर्णय; अमेरिका, फ्रान्स, जर्मनीच्या राजदूतांवर केली कारवाई


इस्तांबूल: तुर्की आणि अमेरिकेसह इतर देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप एर्दोगन यांनी अमेरिका, फ्रान्स, जर्मनीसह १० देशांच्या राजदूतांना देश सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत. तुर्की सरकारने या राजदूतांना अस्वीकार्य व्यक्ती घोषित केले आहे. या राजदूतांनी तुर्कीच्या तुरुंगात कैद असलेल्या सामाजिक कार्यकर्त्याला मुक्त करण्याची मागणी केली होती.

अंकारामध्ये अमेरिका, फ्रान्स, जर्मनीसह १० देशांच्या राजदूतांनी काही दिवसांपूर्वी एक निवदेन प्रसिद्ध केले होते. व्यावसायिक असलेल्या उस्मान कवला यांच्यावर दोषारोप नसतानाही २०१७ पासून तुरुंगात डांबले आहे. राष्ट्रपती एर्दोगन यांनी या वक्तव्याला ‘असभ्य’ असल्याचे म्हणत, राजदूतांना Persona non grata घोषित केले.

FATF च्या बैठकीत पाकिस्तानसह तुर्कीलाही झटका; दोन्ही देश करड्या यादीत
एर्दोगनने पश्चिम शहर एस्किसेरमध्ये एका रॅली दरम्यान त्यांनी म्हटले की, या १० देशांच्या राजदूतांच्या व्यक्तिगत गंभीर कार्यवाहीवर कारवाई करण्याचे निर्देश परराष्ट्र मंत्र्यांना दिले आहेत. या लोकांनी (राजदूतांनी) तुर्कीला आधी जाणून घ्यावे. तुर्कीला जाणून घ्यायचे नसेल तर त्यांनी देशाबाहेर जावे, असेही एर्दोगान यांनी म्हटले.

तुर्कीने कारवाई केलेल्या राजदूतांमध्ये अमेरिका, फ्रान्स, जर्मनीशिवाय, नेदरलँड्स, कॅनडा, डेन्मार्क, स्वीडन, फिनलँड, नॉर्वे आणि न्यूझीलँड या देशांच्या राजदूतांचा समावेश आहे. या सर्व राजदूतांना परराष्ट्र मंत्रालयाने बोलावणे धाडले होते.

भारतीय स्प्रेमध्ये आढळला घातक जीवाणू; दोघांचा मृत्यू
६४ वर्षीय कवाला यांना २०२० मध्ये २०१३ मध्ये झालेल्या देशव्यापी सरकारविरोधी आंदोलनाशी संबंधित असल्याच्या आरोपातून सुटका केली होती. मात्र, त्यानंतर हा आदेश बदलण्यात आला आणि सन २०१६ मध्ये सत्तापालट करण्याच्या प्रयत्नांच्या आरोपात त्यांचा समावेश करण्यात आला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: