IT Department Raids In Nashik: नाशिकमध्ये खळबळ; कांदा व्यापाऱ्यांकडे सापडले घबाड; २५ कोटी जप्त, ‘ते’ ७५ कोटी कुठे गेले?


हायलाइट्स:

  • नाशिकमध्ये आयकर विभागाची मोठी कारवाई.
  • कांदा आणि द्राक्ष व्यापाऱ्यांकडे सापडले घबाड.
  • २५ कोटी जप्त; ७५ कोटींचा घेताहेत शोध.

नाशिक: मागील दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात आयकर विभागाने १० ते १५ कांदा व्यापाऱ्यांच्या मालमत्तेची झडती घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, आयकर विभागाने तब्बल २५ कोटी रुपयांची रोकड हस्तगत केली. अद्याप तपास पूर्ण झालेला नसल्याचे सांगण्यात आले. ( Income Tax Department Raids In Nashik )

वाचा: मलिक-वानखेडे वाद: उज्ज्वल निकम यांनी दिला ‘हा’ धोक्याचा इशारा

आयकर चुकवलेल्या व्यापऱ्यांमध्ये कांदा आणि काही द्राक्ष व्यापाऱ्यांचा समावेश आहे. बहुतांश व्यापारी पिंपळगाव बसवंत येथील असून, दोन व्यापारी नाशिक मधील आहेत. सदर व्यापाऱ्यांनी एकूण शंभर कोटी रुपयांचा आयकर चुकवल्याचा आयकर कार्यालयाचा अंदाज असून, त्यातील २५ कोटी रुपये जप्त करून ही रक्कम ‘ स्टेट बँक ऑफ इंडिया ‘च्या शाखेत जमा करण्यात आली आहे.

वाचा: परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा सापडला? ‘या’ शहरात असल्याचा संशय

दरम्यान, आयकर विभागाच्या या कारवाईमुळे कांदा व्यापऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष या करवाईकडे लागले आहे.

कांद्याचे भाव वाढले असतानाच…

देशातील कांद्याची मोठी बाजार पेठ म्हणून नावलौकिक असलेल्या नाशिक मध्ये दरवर्षी हजारो कोटी रुपयांची उलाढाल होते. यात कांदा आणि द्राक्ष पिकांचा सर्वात मोठा वाटा असतो. देशभरात येथून मालाचा पुरवठा होतो. यामुळे व्यापारीही येथे मोठ्या संख्येने आहेत. मागील काही दिवसांपासून कांद्याचे भाव वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने केलेली कारवाई महत्त्वाची ठरते. आगामी काळात आयकर चुकविणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या आणि पैसा वाढतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वाचा:‘समीर वानखेडे यांच्या विरोधात बोलाल तर…’; नवाब मलिक यांना धमकीचा फोन



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: