हायलाइट्स:
- ३८ वर्षीय महिलेची धारदार चाकूने गळा कापून निर्घृण हत्या
- पैशाच्या देवाण-घेवाणीवरून झाला होता वाद
- आरोपीला पोलिसांनी केली अटक
या हत्येप्रकरणी पवन जयंत चेके (रा. इचोरी) या मारेकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
शहरातील लोहारा भागात असलेल्या इंदिरा नगर येथील महिला सविता जाधव हिच्यासोबत इचोरी येथील पवन चेके याची पैशाची देवाण-घेवाण सुरू होती. शनिवारी पवन हा सविता जाधव यांच्या घरी गेला होता, यावेळी पैशाच्या देवाण-घेवाणीवरून पवन आणि सविता जाधव यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. या वादातून रागात पवन याने सविता जाधव या महिलेच्या गळ्यावर धारदार चाकूने वार निर्घृण हत्या केली. यावेळी आईला वाचवण्यासाठी गेलेला मुलगा दिशेन्द्र हा देखील जखमी झाला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह लोहारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांनी लोहारा पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती जाणून घेतली. त्यानंतर काही तासांतच त्यांच्या मार्गदर्शनाखाली मारेकरी पवन चेके याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अनिल घुगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.