उदयनराजेंनी अप्रत्यक्षपणे लगावला शरद पवारांना टोला; नेमकं काय म्हणाले?


हायलाइट्स:

  • साताऱ्यात उदयनराजेंची जोरदार फटकेबाजी
  • रयत शिक्षण संस्थेच्या मुद्द्यावरून पवारांना टोला
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच अध्यक्ष असावेत, अशी मांडली भूमिका

सातारा : ‘रयत शिक्षण संस्थेचे खासगीकरण करणे म्हणजे रयतेला फुली मारण्यासारखे आणि एका कुटुंबाला महत्व देण्यासारखे आहे. रयतमध्ये सत्तेचे केंद्रीकरण सुरू असून वडाच्या झाडाचे केंद्रीकरण किंवा खासगीकरण झाले तर हा वटवृक्ष वठणार आणि त्याला वाळवी लागेल,’ असं म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी या मुद्द्यावरून अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे.

उदयनराजे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना रयत शिक्षण संस्थेचे खासगीकरण करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप केला. उदयनराजे म्हणाले की, असं झालं तर सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागेल. रयत शिक्षण संस्थेची घटना कर्मवारी अण्णांनी केली होती. त्याच्या आधारावर संस्थेची स्थापना झाली होती. पण असं काहीतरी घडलंय की अण्णांच्या विचारांशी फारकत घेण्यात आली आहे.

Baba Ramdev: बॉलिवूड-ड्रग्ज कनेक्शनवर बाबा रामदेव यांचं मोठं विधान; ‘ही घाण साफ करा, अन्यथा…’

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच हवे अध्यक्ष’

शरद पवार हे सध्या रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. मात्र या संस्थेचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच हवेत, असा मुद्दा उपस्थित करून उदयनराजे यांनी शरद पवारांच्या अध्यक्षपदाबद्दल आक्षेप घेतल्याचं दिसून येत आहे. ते म्हणाले, लोकांच्या प्रवाहाच्या विरोधाच्या दिशेने मतांची मांडणी करत असाल तर ती चूकच आहे. रयत शिक्षण संस्थेची स्थापना १९१९ साली कर्मवीर अण्णांनी केली. त्यांचा जन्म कोल्हापूरात झाला असला तरी कर्मभूमी सातारा होती. थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सातारच्या राजवाड्यात त्या काळात पुरोगामी विचार म्हणून मांडणी केली. राजवाड्यात त्यांनी शाळा सुरू केली. मुलांबरोबर मुलींसाठीही सर्वात प्रथम शिक्षणाची दालने त्यांनी खुली केली. त्यातून प्रेरणा घेऊन महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची ज्योत पुढे नेली. थोरले प्रतापसिंह महाराजांनी दिलेल्या विचारातून प्रेरणा घेऊन आण्णांनी ‘रयत’ची स्थापना केली. सर्वसामान्य कुटुंबातील कोणतेही मुलं शिक्षणापासून वंचित राहता कामा नयेत. तोच विचार घेऊन अण्णांनी वाटचाल केली.
Sanjay Raut: ‘तुमचं सरकार घालवल्यापासून आम्हालाही शांत झोप लागतेय’

याविषयीची एक आठवण सांगता उदयनराजे म्हणाले, ‘मी लहान असताना कर्मवीर आण्णा आमची आज्जी राजमाता सुमित्राराजे भोसले यांना भेटण्यासाठी येत असत. त्यांची चर्चा काय होत होती मला माहीत नाही. पण, सातारा राजघराण्याचे मोठे योगदान रयतच्या स्थापनेत आहे. त्यासाठी लागणारे सहकार्य असेल, जमीन असेल, असं वाटेल ते सहकार्य दिलं. रयत शिक्षण संस्थेची घटना त्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारचे राजकारण या संस्थेत येऊ नये म्हणून या संस्थेचा अध्यक्ष हा राज्याचा मुख्यमंत्री असावा,’ अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

सातारा क्रीडा संकुलावरुन खासदार उदयनराजेंची कडाडून टीकाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: