साताऱ्यातील जवान सचिन विश्वनाथ काटे यांना वीरमरण, अवघ्या २४ व्या वर्षी निधन


सातारा : सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यात राहणारे शंभूखेड गावचे सुपुत्र जवान सचिन विश्वनाथ काटे यांना देशसेवा करताना वीरमरण आले आहे. सचिन काटे यांना अवघ्या २४ व्या वर्षी राजस्थानमध्ये देशसेवा करताना वीरमरण आलं. सचिन यांच्या जाण्यामुळे संपूर्ण काटे कुटुंबावर आणि गावावर शोककळा पसरली आहे.

सचिन काटे हे देशसेवा बजावत असताना राजस्थानमध्ये बुधवारी रात्री वीरमरण आलं याची माहिती भाऊ रेवन काटे यांना राजस्थान लष्कराच्या युनिटने दिली. खरंतर पाच वर्ष आधीच सचिन हे भारतीय सेनेमध्ये दाखल झाले होते. त्यांचा लहान भाऊ देखील आसाममध्ये देशसेवा बजावत आहे. आई-वडील हे गावीच शेती करतात. त्यामुळे मुलाची ही धक्कादायक बातमी वाचल्याने आई-वडीलांना मोठा धक्का बसला आहे.

सचिन काटे यांना वीरमरण आल्याने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सचिनच्या मागे त्याचे आई-वडील आणि लष्करात असलेला त्यांचा लहान भाऊ असा परिवार आहे. अधिक माहितीनुसार, शनिवारी म्हणजे आज त्यांच्या पार्थिवावर मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपची कसोटी, इतिहासात प्रथमच विक्रमी ३८७ उमेदवारी अर्जSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *