महागाईबाबत आरबीआय गंभीर; गव्हर्नर म्हणतात, ‘४ टक्क्यांचं उद्दिष्ट गाठावंच लागेल’


नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या महिन्याच्या सुरुवातीला पतधोरण आढावा बैठकीत धोरणात्मक दर कायम ठेवण्याच्या बाजूने मतदान केले. त्यावेळी त्यांनी केंद्रीय बँक विना-व्यत्ययपणे किरकोळ चलनवाढ ४ टक्क्यांच्या पातळीपर्यंत कमी करेल, असा आग्रह धरला. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) जाहीर केलेल्या चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीच्या तपशीलातून ही माहिती मिळाली आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, महागाईचा दर ४ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यावर आमचा भर आहे. या वर्षी जुलै आणि ऑगस्टमध्ये महागाई तुलनेने जास्त होती. सप्टेंबरमध्ये त्यात घट होत ४.३५ टक्क्यांवर आली. ६ ते ८ ऑक्टोबर दरम्यान चलनविषयक धोरण समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये दास म्हणाले की, ऑगस्ट २०२१ च्या बैठकीत समितीला सलग दुसऱ्या महिन्यात समाधानकारक मर्यादा ओलांडणाऱ्या महागाईच्या आव्हानांचा सामना करावा लागला.

महागाईचा परिणाम; तब्बल १४ वर्षांत पहिल्यांदाच काडीपेटीच्या किंमतीत वाढ
Fuel Price: कच्च्या तेलाच्या किमती या आठवड्यात पहिल्यांदाच घसरल्या; पेट्रोल-डिझेलवर परिणाम होणार?

महागाई दरामध्ये होणार घट

जुलै-ऑगस्ट दरम्यान महागाई कमी झाल्यामुळे एमपीसीचा दृष्टिकोन आणि आर्थिक धोरणात्मक भूमिका योग्य असल्याचे सिद्ध झाले. या वर्षी जुलै आणि ऑगस्टमध्ये महागाई तुलनेने मध्यम राहिल्याने अन्न महागाईत लक्षणीय घट झाली आहे.

अवकाळी पावसाची भूमिका ठरणार महत्वाची

दास पुढे म्हणाले की, जर अवकाळी पाऊस पडला नाही, तर विक्रमी खरीप उत्पादन, पुरेसा अन्नसाठा, पुरवठा आणि अनुकूल आधारभूत परिणामांमुळे अन्न-धान्य महागाईत घट कायम राहील, पण कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने वाहतुकीचा खर्च वाढण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.

Home Loan: ‘ही’ सरकारी बँक गृहकर्जावर देतेय बंपर ऑफर; जाणून घ्या सविस्तर
Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करताय; जोखीम आणि फायद्यांबद्दल जाणून घ्या
महागड्या खाद्यतेलापासून मिळणार दिलासा; गृहिणींची दिवाळी गोड होणार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: