मुंबई :मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. सौम्य लक्षणे असल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते, मात्रा आता त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आहे. राज ठाकरे यांच्या आईचा करोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आल्याचे समजते. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.
दरम्यान, राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका जवळ आल्याने सर्वच पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. राज ठाकरे हेदेखील विविध शहरांचे दौरे करत आहेत. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे आगामी काही दिवसांतील त्यांचे दौरे स्थगित करण्यात आले आहेत.