Citi Bank: ‘ही’ विदेशी बँक खरेदी करण्याची शर्यत; HDFC, अॅक्सिस, कोटक महिंद्रा यांमध्ये जोरदार स्पर्धा


नवी दिल्ली : अमेरिकन बहुराष्ट्रीय बँक सिटी बँकेने भारतातील व्यवसाय गुंडाळण्यास सुरवात केली आहे. त्यांनी हा व्यवसाय विकण्याची तयारी सुरू आहे. माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तांनुसार, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि इंडसइंड बँकेने सिटी बँकेचे इंडिया ऑपरेशन्स खरेदी करण्यासाठी बोली लावली आहे. त्याची मुदत २२ ऑक्टोबर रोजी संपली.

डीबीएस बँकेने यापूर्वीही म्हटले होते की, ते सिटीबँकचा भारतातील व्यवसाय खरेदी करण्यास इच्छुक आहे. काही लोकांच्या मते, डीबीएस बँकेने बोली प्रक्रियेत भाग घेतला नाही. असे मानले जात होते की, जेव्हा सिटीबँक आपले भारतीय कामकाज विकेल, तेव्हा खरेदीदारांकडून चांगली पसंती मिळेल, पण सिटीग्रुपने जादा व्हॅल्युएशनची मागणी केल्यामुळे अनेक खरेदीदारांनी माघार घेतली.

मोठ्या बँकांना फारसा फायदा होणार नाही

अलीकडेच क्रेडिट सुईसचा अहवाल आला. या अहवालानुसार, सिटीबँकेचा किरकोळ व्यवसाय (क्रेडिट कार्ड आणि तारण कर्ज) मोठ्या बँकेत विलीन झाल्यास, त्यांची कर्जे आणि ठेवींमध्ये कमाल ३-६ टक्क्यांनी वाढ होईल.

Loan Against PPF: कर्ज घेताय… वैयक्तिक आणि पीपीएफ लोनमध्ये काय आहे स्वस्त?
महागाईबाबत आरबीआय गंभीर; गव्हर्नर म्हणतात, ‘४ टक्क्यांचं उद्दिष्ट गाठावंच लागेल’
११९ वर्षांनंतर घेणार भारताचा निरोप

कोटक महिंद्रा बँक आणि इंडसइंड बँकेला या कराराचा खूप फायदा होऊ शकतो. कोटक महिंद्राच्या कर्ज आणि ठेवींमध्ये १३ टक्क्यांची आणि इंडसइंड बँकेची २० टक्क्यांनी वाढ होईल. सिटी बँक इंडियाचे सध्या २.६ दशलक्ष क्रेडिट कार्ड वापरकर्ते आहेत. हे एकत्र केल्यास कोटक आणि इंडसइंड बँकेची ग्राहकसंख्या दुप्पट होईल. बचत ठेवींच्या आधारे कोटक ३० टक्क्यांनी आणि इंडसइंड बँक ६० टक्क्यांनी वाढेल. सिटी बँकेने भारतासह एकूण १३ देशांमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये ऑस्ट्रेलिया, बहरीन, चीन, इंडोनेशिया, कोरिया, मलेशिया, फिलिपिन्स, पोलंड, रशिया, तैवान, थायलंड आणि व्हिएतनाम या देशांचा समावेश आहे.

भारतात सिटीबँकचा व्यवसाय

११९ वर्षांपूर्वी म्हणजे १९०२ मध्ये सिटी बँक भारतात आली. त्यांची पहिली शाखा कोलकाता शहरातून सुरू झाली. सिटीबँक ग्रुप भारतातील क्रेडिट कार्ड, रिटेल बँकिंग, होम लोन आणि वेल्थ मॅनेजमेंटमध्ये व्यवहार करतो. या बँकेच्या भारतात ३५ शाखा आहेत आणि सध्या ग्राहक बँकिंग व्यवसायात सुमारे ४००० कर्मचारी कार्यरत आहेत. भारतातील सिटीबँकच्या एकूण ग्राहकांबद्दल बोलायचे झाले, तर ही संख्या सुमारे २९ लाख आहे. या बँकेत १२ लाख खाती असून एकूण २२ लाख ग्राहकांकडे सिटी बँकेचे क्रेडिट कार्ड आहे.

महागाईचा परिणाम; तब्बल १४ वर्षांत पहिल्यांदाच काडीपेटीच्या किंमतीत वाढ
Forex Reserves: देशाच्या परकीय चलनसाठ्यात वाढ; आकडा ६४१ अब्ज डॉलरवर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: