‘हा रामदासभाई जिवंत असेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही’, भर सभेत रामदास कदमांची गर्जना


दापोली : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात दापोली विधानसभा मतदासंघात सध्या राजकिय धूळवड सध्या सुरु आहे. नेते रामदास कदम, आमदार योगेश कदम यानी शिवसेनेत जोरदार इंकमिंगचा धडाका सुरु केला आहे. दापोलीतही राष्ट्रवादी मधून शिवसेनेत इनकमिंग सुरू करून राजकिय भूकंप केला आहे. राष्ट्रवादीमध्ये गेली १५ वर्षे नगरसेवक राहिलेले सचिन जाधव यांनी पदाचा राजीनामा देत सेनेचा भगवा खांद्यावर घेतला आहे.

गेले काही दिवस मीडियाजवळ फार न बोलणारे शिवसेना नेते रामदास कदम यांनी पक्षप्रवेशावेळी मौन सोडत ‘हा रामदासभाई जिवंत असेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही’ असे जाहीरपणे सांगितले. गेले काही दिवस विरोधकांकडून कदम पक्ष सोडणार शिवसेनेतही त्यांचे वजन घटले अशी जाहीर टीका मतदारसंघातील रामदास कदम यांचे विरोधक करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कदम यांनी जाहीरपणे केलेले हे विधान महत्वपूर्ण मानल जात आहे.

‘आमदार योगेश कदम हे शिवसेनेच्या माध्यमातून करत असलेली विकासकामे पाहून त्यांच्या स्वप्नातील दापोलीशहर घडावे यासाठी आपण नगरसेवक पदासह राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला, असं यावेळी सचिन जाधव म्हणाले. ते पुढे म्हणाले की, ‘यावेळी आपण शहराच्या हितासाठि निर्णय घेतला. पण भाई खर सांगतो, दुसऱ्या दिवशीच कुजबुज सुरु झाली की, रामदास कदम हेच भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. असं मला कळलं आणि आमच्या काळजाच पाणी झालं. तेव्हा आपण भाईंची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी संगितले की, असं काही नाही. या अफवा असून तुम्ही काही काळजी करू नका.’ हा किस्सा सांगताना उपस्थितांनीही याला हसून दाद दिली.

साताऱ्यातील जवान सचिन विश्वनाथ काटे यांना वीरमरण, अवघ्या २४ व्या वर्षी निधन
याचवेळी शेजारी उभे असलेले शिवसेना नेते रामदास कदम यांनी माईक हातात घेऊन सांगितले की, ‘हा रामदासभाई जिवंत असेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही’ अशी घोषणा करत त्यांनी चालू असलेलेला चर्चांना एकप्रकारे पूर्णविराम दिला. कदम यांनी हे सांगताच कार्यकर्त्यांनाही स्फुरण चढले.

यावेळी कार्यक्रमाला, शिवाजीनगर, वणंद या गावातील काही राष्ट्रवादी कार्यकर्ते, महिला यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेत राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला हा मोठा धक्का बसला आहे. दापोली शहर व तालुक्याच्या राजकरणात राजकीय घडामोडीना वेग आला आहे.

परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा सापडला? ‘या’ शहरात असल्याचा संशयSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: