Amarinder Singh: पंजाबमध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या पाकिस्तानी गर्लफ्रेंडची चर्चा


हायलाइट्स:

  • अमरिंदर सिंह यांची पाकिस्तानी मैत्रीण आरुसा आलम
  • आम आदमी पक्षाचे नेते हरपाल सिंह चीमा यांनी साधला निशाणा
  • काँग्रेस, भाजप आणि अमरिंदर सिंह यांच्यावर साधला नेम

चंदीगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्याकडून नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा करण्यात आल्यानंतर काँग्रेससहीत आम आदमी पक्षाचीही धांदल उडालीय. याच दरम्यान, एका नव्या चर्चेला तोंड फुटलंय. ‘पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांची पाकिस्तानी गर्लफ्रेंड आरुसा आलम हिचे आयएसआयशी संबंध’ असल्याचा दावा विरोधकांकडून केला जातोय. (Captain Amarinder Singh and Aroosa Alam)

अमरिंदर सिंह यांनी नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा केल्यानंतर काँग्रेसनं त्यांना ‘संधिसाधू’ ठरवण्यात आलं. तर आगामी निवडणुकीत अमरिंदर सिंह यांच्या सहकार्याची संधी निर्माण झाल्यानंतर भाजपकडून त्यांना ‘देशभक्त’ असल्याचा निर्वाळा देण्यात आलाय. यावर, आम आदमी पक्षानंही कॅप्टनच्या ‘देशभक्ती’वर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय.

काँग्रेस आणि अमरिंदर सिंहांवर टीका

आम आदमी पक्षाचे नेते हरपाल सिंह चीमा यांनी ‘कॅप्टनच्या पाकिस्तानी गर्लफ्रेंड’च्या चर्चेला हवा देत एका दगडात तीन पक्षी मारण्याचा प्रयत्न केलाय.

‘कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या निवासस्थानी उतरलेल्या कथितरित्या आयएसआय एजंटबद्दल काँग्रेस नेत्यांचं आणि मंत्र्यांचं आता काय म्हणणं आहे? त्यावेळी काँग्रेस नेत्यांनी याचा पत्ता नव्हता की ती महिला आयएसआय एजंट आहे?’ असं म्हणत हरपाल सिंह चीमा यांनी काँग्रेससोबत अमरिंदर सिंह यांनाही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलाय.

Supreme Court: ‘आठ लाख उत्पन्नाचा आकडा कुठून? निकष सांगा, अन्यथा आरक्षण रोखू’
Parliament Session: मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडे पुढच्या महिन्यात आयती संधी?
भाजपलाही विचारला प्रश्न

तसंच ‘अत्यंत शांतीपूर्ण पद्धतीनं आपला विरोध नोंदविणाऱ्या शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटलं जातं… आणि ज्या अमरिंदर सिंहांच्या घरी पाकिस्तानी एजन्सी आयएसआयची एजंट पाहुणी म्हणून दाखल होते ते मात्र ‘देशभक्त’ आहेत’ असं म्हणत चीमा यांनी अमरिंदर सिंहांना ‘देशभक्ती’चं प्रमाणपत्र देणाऱ्या भाजपलाही अडचणीत आणलंय.

‘चौकशी होणार’

चीमा यांच्यानंतर पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांनीही ‘कॅप्टन अमरिंदर सिंह यांची पाकिस्तानी मैत्रीण आणि तिच्या पाकिस्तान गुप्तचर यंत्रणेशी संबंधांची चौकशी करण्यात येईल’, असा दावा केलाय.

कॅप्टन अमरिंदर सिंह यांना वारंवार समज दिल्यानंतरही त्यांची पाकिस्तानी महिला मित्र तब्बल साडे चार वष त्यांच्या सरकारी निवासस्थानी राहिली, असंही रंधावा यांनी म्हटलंय.

ईडीकडून चौकशी झाल्यानंतर आणि पाकिस्तानी नागरिकाला शरण दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याचा दावाही रंधावा यांनी केला आहे.

amit shah visit to jammu and kashmir : अमित शहा आजपासून जम्मू-काश्मीर दौऱ्यावर, कलम ३७० हटवल्यानंतर पहिलाच दौरा
lakhimpur kheri case : मंत्रिपुत्र आशिष मिश्राचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढलाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: