शहांचे दहशतवादी संघटनांना उत्तर
अमित शहा यांचा हा दौरा आणखी महत्त्वाचा ठरतो. कारण गेल्या एका महिन्यात दहशतवाद्यांनी आपली रणनीती बदलली आणि ते सामान्यांची हत्या करत आहेत. गेल्या एका महिन्यात ११ निष्पाप नागरिकांची हत्या केली गेली. गृहमंत्री शहा यांनी काश्मीरचा दौरा करू नये यासाठी दहशतवादी संघटना अधिक सक्रिय झाल्या असं बोललं जातंय. पण गृहमंत्री शहा यांनी या भेटीबाबत अधिक सक्रियता दाखवली. यासोबतच सुरक्षा यंत्रणांना दहशतवादी संघटनांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. परिणामी गेल्या १५ दिवसांत १३ दहशतवाद्यांचा खात्मा केला गेला.
श्रीनगरच्या प्रत्येक रस्त्यावर तिरंगा फडकतोय
अमित शहा यांच्या दौऱ्यासंदर्भात श्रीनगरच्या जवळपास सर्व रस्त्यांच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर तिरंगी झेंडे लावण्यात आला आहेत. डल लेक ते हॉटेल सेंटॉरपर्यंतचा रस्ता सुंदर सजवण्यात आला आहे. SKICC इमारतीच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वागतासाठी मोठे होर्डिंग लावण्यात आले आहेत.
भाजप नेत्यांमध्ये उत्साह
गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याबद्दल भाजप नेत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. स्थानिक काश्मिरींना अमित शाह यांच्या भेटीपासून मोठ्या आशा आहेत. खऱ्या अर्थाने त्यांची भेट काश्मीरच्या विकासात आणि दहशतवादाविरोधातील लढाईत महत्त्वाची सिद्ध होईल. सामान्य काश्मिरींना शांतता हवी आहे. आमचे सरकार देखील शांततेच्या बाजूने आहे, असं जम्मू -काश्मीर भाजपचे सरचिटणीस सुनील शर्मा यांनी सांगितले.
pinaka and smerch : चीन सीमेवर पिनाका आणि स्मर्च रॉकेट तैनात, ४४ सेकंदात ७२ रॉकेट डागण्याची क्षमता