Rohit Pawar: खडसेंच्या ईडी चौकशीमागे कुणाचा हात?; रोहित पवारांनी केला ‘हा’ गंभीर आरोप


हायलाइट्स:

  • भाजपकडून ओबीसी नेत्यांची ताकद कमी करण्याचे काम.
  • खडसेंच्या ईडी चौकशीवरून रोहित पवार यांचा आरोप.
  • गिरीश महाजन यांच्यावरही थेट शब्दांत साधला निशाणा.

जळगाव:एकनाथ खडसे हे मोठे नेते आहेत. भाजपमध्ये असतानापासून त्यांची ताकद कमी करण्याचे काम भाजपमधील काही नेत्यांनी केले. आता जळगाव जिल्ह्यात भाजप नेते स्वत:ची ताकद वाढविण्यासाठी बहुजन समाजाच्या ज्येष्ठ नेत्यांची ताकद कमी करण्याचे काम करीत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज केली. तसेच ओबीसी नेत्यांची ताकद कमी करण्याचा एक भाग म्हणजे ईडी चौकशी असल्याचा आरोपही त्यांनी केला. ( Rohit Pawar On Eknath Khadse )

वाचा: समीर वानखेडे यांना पुन्हा नवाब मलिक यांचे आव्हान; ‘त्या’ दाव्यावर ठाम

आमदार रोहित पवार हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई मंदिरात जाऊन दर्शन घेत आरतीही केली. यावेळी त्यांनी वारकऱ्यांसमवेत विविध विषयांवर चर्चा केली. त्यानंतर जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांची भेट घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, स्वतःची ताकद वाढवण्यासाठी बहुजन ओबीसी नेत्याची ताकद कमी करण्याचे काम येथील भाजप नेत्यांकडून होत आहे. ईडी व सीबीआय यंत्रणांकडून होणारी चौकशी हा त्याचाच एक भाग आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर देखील ईडी व सीबीआयच्या अशाच कारवाया सुरू आहेत. एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई वाढल्या. त्याच पद्धतीने राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर देखील कारवाई केली जात आहे. भाजपने आता हाच दडपशाहीचा मार्ग अवलंबला आहे.

वाचा:बॉलिवूडला मुंबईबाहेर नेऊ देणार नाही; अजितदादांचा योगींना सूचक इशारा

गिरीश महाजनांना पैशाचा गर्व

आमदार पवार यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावरही यावेळी टीका केली. जळगाव जिल्ह्यातील भाजपचे नेते पैशांच्या जोरावर फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. त्यांनी थेट गिरीश महाजन यांचे नाव घेतले. गिरीश महाजन यांना पैशांच्या ताकदीचा घमंड असल्याने ते फोडाफोडीच्या राजकारणासाठी त्याचा वापर करत असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला.

वाचा: पालिका अधिकाऱ्याकडे कोट्यवधीचे घबाड; ३ फ्लॅट, ११ लाख कॅश, अर्धा किलो सोनं!Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: