lakhimpur kheri case : मंत्रिपुत्र आशिष मिश्राचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला


लखीमपूर खिरीः लखीमपूर खिरी जिल्ह्यातील ( lakhimpur kheri case ) तिकुनिया भागात झालेल्या कार खाली चिरडून ४ शेतकऱ्यांची हत्या झाली होती. ३ ऑक्टोबरला घडलेल्या या घटनेप्रकरणी मुख्य आरोपी आशिष मिश्रा उर्फ मोनूसह चार आरोपींची जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी पुन्हा पोलीस कोठडीत ( ashish mishra remanded in police custody again ) रवानगी केली. आरोपी आशिष मिश्रा हा केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आहे.

“तपासकर्त्यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी (सीजेएम) चिंता राम यांच्या न्यायालयात अर्ज दाखल करून आशिष मिश्रा उर्फ मोनू, अंकित दास, शेखर भारती आणि लतीफ या आरोपींची पोलीस कोठडी मागितली होती. यावेळी फिर्यादी आणि बचाव पक्षाचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने चार आरोपींची २२ ते २४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत रवनागी केली आहे. पोलीस कोठडीचा कालावधी हा २२ ऑक्टोबर संध्याकाळी ५ वाजता सुरू होईल आणि २४ ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजता संपेल, अशी माहिती एसपीओ एस. पी. यादव यांनी दिली.

न्यायालयाने तपासात हस्तक्षेप न करता आरोपींच्या वकिलाला उपस्थित राहण्याची परवानगी देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देशही दिले आहेत, असं पोलीस अधिकारी यादव यांनी सांगितलं. आरोपी अंकित दास हा माजी केंद्रीय मंत्री (दिवंगत) अखिलेश दास यांचा भाचा आहे. अंकित दास याला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि लखनऊला आणलं होतं. त्याच्या घरातून एक रिव्हॉल्व्हर आणि बंदूक जप्त करण्यात आली होती. यापूर्वीही सुनावणीतही न्यायालयाने आशिष मिश्रासह इतर आरोपींना पोलीस कोठडी सुनावली होती.

lakhimpur kheri farmer : लखीमपूरच्या शेतकऱ्याने भर बाजारात पेट्रोल टाकून धानाला लावली आग

आशिष मिश्राला ९ ऑक्टोबरला केली होती अटक

आशिष मिश्राला १४ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. या प्रकरणी सुनावणीनंतर न्यायालयाने त्याला १२ ते १५ ऑक्टोबर दरम्यान कोठडीत सुनावली होती. या प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यासह १५ ते २० जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आशिषला गेल्या ९ ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत १० आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Farmers Protest: ‘दिल्लीच्या सीमा शेतकऱ्यांनी नाही, पोलिसांनी रोखल्या’, आंदोलकांनी हटवलेSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: