निष्क्रिय प्रस्थापितांना करकंबच्या गाव तलावात पाणी सोडण्याचा प्रश्न सोडविणे न जमल्यामुळे भाजपा करणार प्रयत्न

निष्क्रिय प्रस्थापितांना करकंबच्या गाव तलावात पाणी सोडण्याचा प्रश्न सोडविणे न जमल्यामुळे भाजपा करणार प्रयत्न
    खा.रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून करकंबच्या पूर्व भागातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार- भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब अंबुरे
करकंब पाझर तलावात पाण्याचा फाटा सोडून पूर्व भागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्रयत्नशील
करकंब / मनोज पवार : करकंब ता.पंढरपूर गावलगत असलेला ब्रिटिश कालीन सुमारे पंचेचाळीस एकरमधील गाव पाझर तलाव हा सन 2005 पासून आजतागायत कोरडा आहे. या गाव पाझर तलावाच्या माध्यमातून जर हा गाव पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला तर गावातील तसेच या परिसरातील पूर्व भागातील शेतकऱ्यांची ग्रामस्थांची पाण्याची टंचाई दूर होणार आहे .  

परंतु या भागातील शेतकर्याची खूप दिवसापासून या तळ्यामध्ये पाणी सोडण्याची मागणी आहे. यासाठी वारंवार माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार ,माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार बबनराव शिंदे यांना वारंवार निवेदने देऊनसुद्धा यात अद्याप यश आलेले नाही.

मोडनिंब वितरेकेतून पाण्याचा कालवा (फाटा) या गाव पाझर तलावात सोडून कायम दुष्काळाने होरपळलेल्या करकंबचा पूर्व भाग , टेंभी परिसर , बार्डी,जाधववाडी या परिसरातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जर पाण्याचा फाटा शेतकऱ्यांसाठी केला तर याचा निश्चितच शेतीस व पिण्यासाठी उपयोग होणार असून हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येईल.यासाठी याचा पूर्ण सर्वे करून करकंब येथील पाझर तलावात पाण्याचा फाटा सोडण्यासाठी व या पूर्व भागातील परिसरातील गावांना जलसिंचनाखाली आणण्यासाठी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब अंबुरे यांनी सांगितले.

  करकंब गाव पाझर तलाव तसेच करकंबचा पूर्वीपासूनचा दुष्काळाने होरपळलेलला पूर्व भाग यासाठी पूर्व भागातील तसेच या परिसरातील शेतकऱ्यांसाठी माढा लोकसभेचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे दिल्ली येथे जाऊन त्यांच्यांशी याबाबत सविस्तर चर्चा करून त्यासंदर्भात केंद्रातील वन विभाग मंत्रालयांतर्गत येणाऱ्या अडचणी तसेच राज्यातील येणाऱ्या अडचणीचा निश्चित पणाने पाठपुरावा करण्याचे वेळोवेळी चर्चेदरम्यान आश्वासन दिले. भारतीय जनता पार्टीचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांचा प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून तुळशी ता.माढा पासून ते करकंब, बार्डी, जाधव वाडीपर्यंत पूर्व भागातील सर्व क्षेत्र जलसिंचन व्हावे या तळमळीने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करणार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब अंबुरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: