pinaka and smerch : चीन सीमेवर पिनाका आणि स्मर्च रॉकेट तैनात, ४४ सेकंदात ७२ रॉकेट डागण्याची क्षमता


गुवाहाटी: प्रत्यक्ष ताबा रेषेवर (LAC) उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी भारतीय लष्कराने चीन ( indian army displays pinaka and smerch ) सीमेजवळील फॉरवर्ड पोझिशन्सवर पिनाका आणि स्मर्च मल्टीपल रॉकेट लॉन्चर सिस्टीम (MRSL) तैनात केले आहे. पिनाका ही एक स्वयंचलित रॉकेट लाँचिंग यंत्रणा आहे. हे रॉकेट ३८ किमी पर्यंतच्या टप्प्यात शत्रूच्या ठिकाणांना लक्ष्य करू शकते. यावरील सहा लाँचर्सची बॅटरीद्वारे ४४ सेकंदात ७२ रॉकेट्स डागण्याची क्षमता आहे.

‘अत्याधुनिक आणि पूर्णपणे स्वदेशी पिनाका वेपन सिस्टीमची रचना संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) केली आहे. ही प्रणाली सरासरी समुद्रसपाटीपासून ३८ किमी पर्यंत लक्ष्यावर मारा करू शकते, असं सीमेवर तैनात लेफ्टनंट कर्नल सारथ यांनी एएनआयला सांगितलं. पिनाका रॉकेटचे नाव महादेवांच्या पिनाक या शिवधनुष्यावरून ठेवण्यात आले आहे. हे भारतीय तोफखाना शस्त्रागारातील एक अतिशय शक्तिशाली शस्त्र आहे. हे ९० किमी अंतरापर्यंत मारा करू शकते’, असं स्मर्चचे (Smerch) बॅटरी कमांडर मेजर श्रीनाथ यांनी शस्त्र प्रणालीची वैशिष्ट्ये सांगताना म्हटले. पिनाका आणि स्मर्च हे दोन्ही भारतीय तोफखान्यातील सर्वाधिक घातक शस्त्रे आहेत. ‘जहां बोला, वहां गोला’ हे भारतीय तोफखान्याचं ब्रिद वाक्य आहे.

captain sariya abbasi : भारताची रणरागिणी! ‘ड्रोन-किलर’ गन्सच्या कमांडर कॅप्टन सरिया अब्बासी यांचे फोटो व्हायरल

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) या वर्षी जूनमध्ये ओडिशा किनाऱ्याजवळील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रातून (ITR) स्वदेशी पिनाका रॉकेटच्या सुधारित आवृत्तीची चाचणी केली होती. चाचणी दरम्यान एकूण २५ पिनाका रॉकेट गुरुवार आणि शुक्रवारी वेगवेगळ्या अंतरावर अचूकपणे लक्ष्य टिपण्यात सक्षम ठरले होते. लांब पल्ल्याची क्षमता प्राप्त करण्यासाठी प्रगत पिनाका प्रणाली विकसित केली गेली आहे.

bofors guns at the tawang : भारताची ‘मुलूखमैदानी तोफ’ अरुणाचलमध्ये LAC वर तैनात,

‘अभ्यास’ लक्ष्य यानची चाचणी यशस्वी

भारताने शुक्रवारी ओडिशातील चांदीपूरच्या केंद्रात हाय-स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट (हीट) अभ्यासची यशस्वी चाचणी घेण्यात आली. डीआरडीओच्या सूत्रांनी ही माहिती दिली. या यशस्वी चाचणीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचे अभिनंदन केले आहे. हे अभ्यास या गॅस टर्बाइन इंजिनावर धावते आणि ते सबसॉनिक वेगाने लांब पल्ल्याचे उड्डाण करू शकते, असं सूत्रांनी सांगितलं.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: