‘१२ दिवसांनंतर सुट्टी घेऊन घरी येणार होता… पण थेट हौतात्म्याची बातमीच आली’


हायलाइट्स:

  • शहीद कर्णवीर सिंह यांना अखेरचा निरोप
  • मध्य प्रदेशातील सतनामध्ये पार पडले अंत्यसंस्कार
  • मुख्यमंत्र्यांकडून शहिदाच्या कुटुंबीयांना एक कोटींची मदत

सतना : २० ऑक्टोबर रोजी जम्मू काश्मीरच्या शोपियाँ भागात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत कर्णवीर सिंह राजपूत शहीद झाले. आज शहीद कर्णवीर यांचं पार्थिवाववर त्यांच्या मूळ गावी अर्थात मध्य प्रदेशातील सतनातील दलदल गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले.

मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

शहिदाला अखेरचा निरोप देण्यासाठी मुख्यमंत्री शिवराज चौहान हेदेखील उपस्थित झाले होते. या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शहिदाच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांचं आर्थिक सहाय्य आणि शहिदाच्या भावाला सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन दिलंय.

२३ वर्षीय कर्णवीर सिंह २१ राजपूत रेजिमेंटचे जवान होते. सध्या ४४ राष्ट्रीय रायफल्समध्ये ते तैनात होते. शहीद होण्यापूर्वी दहशतवाद्यांसोबत चकमकीत त्यांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं. मात्र, क्रॉस फायरिंगमध्ये छातीत गोळी लागल्यानं त्यांना त्यांना हौतात्म्य आलं.

वयाच्या केवळ २५ व्या वर्षी हुतात्मा झालेल्या कर्णवीर सिंह यांच्या आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. पिता रवि कुमार सिंह यांना आपले अश्रू आवरणंही कठीण झालं तर आई धाय मोकलून आपल्या कधीही परत न येणाऱ्या पुत्राच्या आठवणीत व्याकूळ झाली.

Flex Fuel Engines: ‘फ्लेक्स फ्युएल इंजिन’च्या वापरानं शेतकऱ्यांना कसा फायदा होऊ शकतो? जाणून घ्या…
लसीकरणावर व्हीआयपी संस्कृती लागू होऊ दिली नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी

कर्णवीर सिंह यांचे वडील सूबेदार मेज रवि कुमार सिंह हेदेखील सैन्यात होते. २०१७ साली ते निवृत्त झाले होते. आपल्या मुलाच्या हौतात्म्यावर आपल्याला अभिमान असल्याचं त्यांनी म्हटलंय.

ज्या दिवशी कर्णवीर सिंह यांना गोळी लागली त्याच्या आदल्याच दिवशी त्यांचं कुटुंबीयांशी फोनवर बोलणं झालं होतं. १२ दिवसानंतर सुट्टी घेऊन घरी येणार असल्याचं त्यांनी आपल्या कुटुंबीयांना सांगितलं होतं. पण कर्णवीर घरी परतलेच नाहीत मात्र त्यांच्या हौतात्म्याची बातमी घरी समजली आणि सगळेच सुन्न झाले.

शहिदाला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येत नागरिक जमा झाले होते. मुख्यमंत्र्यांसहीत राज्यमंत्री रामखेलावन पटेल, खासदार गणेश सिंह, राजमणि पटेल, आमदार विक्रम सिंह विक्की, निलांशु चतुर्वेदी, सिद्धार्थ कुशवाहा, पोलीस आणि प्रशासनाचे वरीष्ठ अधिकारीही इथं उपस्थित झाले होते.

Fuel Prices: ‘मोदींच्या खरबपती मित्रांच्या’ माध्यमातून प्रियांका गांधींचा सरकारवर निशाणा
PM Narendra Modi: आज पंतप्रधान मोदींच्या संबोधनात काय? ‘सोशल मीडिया’वर रंगली चर्चा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: