Dilip Walse Patil: आर्यन खान प्रकरण गाजत असतानाच गृहमंत्र्यांचं ड्रग्जबाबत परखड मत; म्हणाले…


हायलाइट्स:

  • अमली पदार्थांच्या सेवनामुळे तरुण पिढी बरबाद होतेय.
  • नक्षलवाद दहशतवादाइतकंच याबाबत गंभीर व्हावं.
  • राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचं परखड मत.

नागपूर: अमली पदार्थांच्या सेवनामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. येणाऱ्या पिढ्यांवरही हे संकट कायम आहे. त्यामुळे त्याबाबत नक्षलवाद व दहशतवाद याच्याइतकेच गंभीर व्हावे लागेल, असे स्पष्ट मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याचे अमली पदार्थांच्या सेवना बाबतचे प्रकरण चर्चेत असताना गृहमंत्र्यांनी केलेले हे वक्तव्य लक्षवेधी ठरले आहे. ( Dilip Walse Patil On Drugs Issue )

वाचा: ‘समीर वानखेडे यांच्या विरोधात बोलाल तर…’; नवाब मलिक यांना धमकीचा फोन

पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या ऑनलाइन उद्घाटन समारोहात दिलीप वळसे पाटील बोलत होते. वनामती येथे आयोजित या कार्यक्रमात पालकमंत्री नितीन राऊत, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त अस्वती दोरजे, आमदार अभिजीत वंजारी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी या निवासस्थानांचे ऑनलाइन उद्घाटन केले. यावेळी पाटील म्हणाले की, अमली पदार्थांची तस्करी ही केवळ परदेशातून होते असे नाही. शाळा-कॉलेजमध्येही विद्यार्थी काही विशिष्ट औषधांची नशा करताना दिसून येतात. ही बाब अत्यंत गंभीर असून पोलीस विभागाने दहशतवाद आणि नक्षलवादाइतकेच या विषयाला गांभीर्याने घ्यावे. याखेरीज अंमली पदार्थांच्या आहारी जाणे तसेच अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणे यामागील मानसिकतेचा शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

वाचा: समीर वानखेडे यांना पुन्हा नवाब मलिक यांचे आव्हान; ‘त्या’ दाव्यावर ठाम

शक्ती कायदा लवकरच पारित होणार

महिला अत्याचारावर प्रतिबंध घालण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शक्ती विधेयकाचा प्रस्ताव मांडला होता. या विधेयकासाठी संयुक्त निवड समितीच्या बैठका पार पडल्या असून येत्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक पारित होणार असल्याची माहिती वळसे पाटील यांनी यावेळी दिली.

हल्ला करायची हिम्मत होणार नाही

गेल्या काही काळात पोलिसांवरील हल्ले वाढले असून ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे मत वळसे पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. सर्वसामान्यांचे रक्षण करतानाच अशा समाजकंटकांवर वचक ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना पोलिसांवर हल्ला करण्याची हिंमत होणार नाही, असेही ते म्हणाले.

वाचा:बॉलिवूडला मुंबईबाहेर नेऊ देणार नाही; अजितदादांचा योगींना सूचक इशारा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: