शेअर बाजार सलग चौथ्या दिवशी घसरला; सेन्सेक्स-निफ्टी स्टेटस जाणून घ्या


मुंबई : बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) सेन्सेक्स शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) १०२ अंकांच्या घसरणीसह बंद झाला. जागतिक स्तरावर संमिश्र स्थिती असताना आयटीसी, मारुती आणि इन्फोसिसमध्ये नुकसान झाल्याने बाजार खाली आला. ३० शेअरचा सेन्सेक्स १०१.८८ अंक किंवा ०.१७ टक्क्यांनी घसरून ६०,८२१.६२ अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६३.२० अंकांनी किंवा ०.३५ टक्क्यांनी खाली येत १८,११४.९० वर बंद झाला.

सेन्सेक्सच्या शेअर्समध्ये आयटीसीला सर्वाधिक नुकसान सोसावे लागले आहे, आयटीसीचा शेअर तीन टक्क्यांनी घसरला. याशिवाय मारुती, इन्फोसिस, एनटीपीसी, एचसीएल टेक आणि टाटा स्टीलमध्येही लक्षणीय घट झाली. दुसरीकडे एचडीएफसी, बजाज ऑटो, इंडसइंड बँक, कोटक बँक, टायटन आणि अॅक्सिस बँक यांच्या शेअर्सने नफा मिळवून दिला.

इतर आशियाई बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कॉस्पी आणि चीनच्या शांघाय कंपोजिट यांना नुकसान सोसावे लागले. तर हाँगकाँगचा हँग सेंग आणि जपानचा निक्की तेजीत राहिला.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल मानक ब्रेंट क्रूड ०.५२ टक्क्यांनी वाढून ८५.०५ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. स्टॉक एक्सचेंजेसकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुरुवारी (२२ ऑक्टोबर) २,८१८.९० कोटी रुपयांचे समभाग विकले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: