नाशिकः आतंकवादी सापडल्याची सोशल मीडियावर अफवा; पोलिसांनी केलं ‘हे’ आवाहन


हायलाइट्स:

  • कळवणमध्ये आतंकवादी सापडल्याची अफवा
  • पोस्ट व्हायरल झाल्याने खळबळ
  • पोलिसांनी केलं महत्त्वाचं आवाहन

म. टा. वृत्तसेवा,कळवणः का हो तुमच्या कळवणला आतंकवादी सापडलेत हे खरं आहे का ? नेमके कुठले आहेत ते..? त्यांनी कुणाला दुखापत नाही केली ना..! असे एक ना अनेक प्रश्न कळवणकरांना सध्या विचारले जात आहेत. त्याचे कारणही तसेच आहे. एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व त्याखाली कळवण शहरात सापडलेत दोन आतंकवादी असे लिहले आहे. त्यामुळं सध्या हा मुद्दादेखील चर्चिले जात आहे. ज्याने तो व्हिडीओ बघितला तो कळवण मधील आपल्या जवळच्या व्यक्तीला फोन करून यासंदर्भात खातरजमा करतांना दिसून येत आहे. मात्र,”तो” व्हायरल व्हिडीओ कळवण येथील नसून शिवाय पोलीस व प्रशासकीय यंत्रणेकडून मॉकड्रिल ही झालेले नाही. हे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

कळवण शहरात दोन आंतकवादी सापडल्याची पोस्ट सोशलमिडीयावर व्हायरल झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपुर्वी काही खोडसाळ व्यक्तींनी कळवण बसस्थानकावर दोन आंतकवादी सापल्याची पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल केल्याने नाशिक जिल्हाच नाही तर संपुर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. सगळी कडे भितीचे वातावरण पसरले आहे. परंतु सदर व्हिडीओ हा कळवण शहरातील नसल्याचे निर्दशनास येत असुन या व्हीडीओमध्ये पोलिस वाहनाचा नंबर एम एच .१२ . टी ओ.७८९४ असा असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे घटनेचे ठिकाण कळवण नसुन सदर प्रकार पुणे जिल्ह्यातील असल्याचे समजले आहे.

आणखी एक ड्रग्ज पेडलर NCB च्या ताब्यात; व्हॉट्सअॅप चॅटमध्ये नाव असल्याचा दावा

त्यात स्थानिक पोलिस प्रशासन व आर्मीचे जवानांनी प्रात्यक्षिक करुन दाखविल्याची चर्चा असुन शहरातील नागरीकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवेला किंवा दहशतीला घाबरू नये असे आवाहन कळवण पोलिसांनी केले आहे. या प्रकारामुळे शहरातील नागरीक भयभित झाले असुन बाहेरगावच्या नातेवाईकांकडून तसेच मित्रांकडून सदर घटनेची माहीती घेण्यासाठी दुरध्वनीव्दारे चौकशी करण्यात येत आहे . दरम्यान सोशल मिडियावर या प्रकारची पोस्ट व्हायरल करून नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन कडक शासन करण्याची मागणी कळवण शहरातून होत आहे.

आगीपासून जीव वाचवण्यासाठी गॅलरीत लटकला, पण हात सुटला; थराराक घटना कॅमेऱ्यात कैदSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: