व्याज दर
पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडल्यावर तुम्हाला वैयक्तिक किंवा संयुक्त खात्यांवर वार्षिक ४ टक्के व्याज दर मिळेल.
गुंतवणूकीची रक्कम
पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडण्यासाठी तुम्हाला किमान ५०० रुपये जमा करावे लागतील.
खाते कोण उघडू शकते?
पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये एक प्रौढ, तसेच दोन प्रौढ व्यक्ती संयुक्त खाते उघडू शकतो. तसेच एका अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने एक पालक, मतिमंद व्यक्तीच्यावतीने एक पालक किंवा १० वर्षांपेक्षा जास्त वयाचे मुले-मुली देखील स्वतःच्या नावे पोस्ट ऑफिस बचत खाते उघडू शकतात.
योजनेची वैशिष्ट्ये –
– या योजनेमध्ये वैयक्तिक खात्याला संयुक्त किंवा संयुक्त खात्याला वैयक्तिक खात्यात रूपांतरित करता येत नाही.
– पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडताना नामांकन अनिवार्य आहे.
– अल्पवयीन व्यक्ती सुजाण झाल्यानंतर नवीन खाते उघडण्याचा फॉर्म सादर करावा लागेल. त्याला त्याच्या नावाने केवायसी कागदपत्रे संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये सादर करावी लागतील.
– या खात्यातून कमीत कमी ५० रुपये काढता येतील .
– योजनेमध्ये जास्तीत जास्त कितीही रक्कम जमा केली जाऊ शकते.
– पोस्ट ऑफिस बचत खात्यातील चेकबुक, एटीएम कार्ड, ई-बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगचा लाभ घेण्यासाठी, आधार, अटल पेन्शन योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा फायदा घेण्यासाठी संबंधित फॉर्म पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावा लागेल.