Covid Vaccination: १०० कोटी डोस खरोखरच दिले गेलेत का?; संजय राऊतांना शंका


हायलाइट्स:

  • कोविड लसीचे १०० कोटी डोस दिल्याबद्दल केंद्राकडून सेलिब्रेशन
  • शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केली शंका
  • १०० कोटी डोस खरंच दिले गेलेत का? – संजय राऊत

मुंबई: कोविड प्रतिबंधक लसीचे १०० कोटी डोस (Covid 19 Vaccine Doses) देण्याचा विक्रम भारतानं केल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज या निमित्तानं देशाला संबोधित केलं. पंतप्रधान मोदी यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. भारतानं इतिहास रचला आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं. मात्र, केंद्राच्या दाव्यावरून सध्या मतमतांतरं सुरू आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याबाबत शंका उपस्थित केली आहे.

मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. ‘कोविड प्रतिबंधक लसींचे १०० कोटी डोस खरोखरच दिले गेले आहेत का?,’ असा प्रतिप्रश्न राऊत यांनी केला. ‘१०० कोटी डोस दिले गेले असतील तर देशासाठी चांगलंच आहे. मात्र, याबाबतीत वेगवेगळे आकडे बाहेर येत आहेत. डोस देण्याच्या बाबतीत भारत जगात १९ व्या स्थानी आहे असंही समोर आलंय. भारतात फक्त ३३ कोटी लोकांनाच दोन डोस दिले गेले आहेत. अनेक लोकांना दुसरा डोस अद्याप मिळालेलाच नाही, अशी आमची माहिती असल्याचं राऊत म्हणाले. अर्थात, एखाद्या गोष्टीचं सेलिब्रेशन करायचंच म्हटलं तर कोण काय करणार? मोदींच्या उत्सवात आपण सगळे सहभागी होऊ या,’ असा चिमटाही राऊत यांनी काढला.

स्मार्ट सिटी योजनेत घोटाळा: राऊत

महाविकास आघाडीच्या नेत्यांवर होत असलेले घोटाळ्यांचे आरोप राऊत यांनी खोडून काढले. याउलट मागील सरकारच्या काळात झालेले घोटाळे आता हळूहळू बाहेर येतील, असं राऊत म्हणाले. पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप राऊत यांनी केला. जे लोक भ्रष्टाचारावर बोलतात, त्यांच्याकडं याची कागदपत्रं आम्ही पाठवली आहेत. भ्रष्टाचार हा कोणत्याही राजकीय पक्षाचा, जातीचा, धर्माचा नसतो. भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार असतो. भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्यांनी राजकीय पक्ष पाहायचा नसतो, असा टोला राऊत यांनी भाजप नेत्यांना हाणला. ‘भ्रष्टाचाराची तक्रार कुठे करायची? त्याला कुठले कागद जोडायचे? हे आम्हाला माहीत आहे,’ असंही राऊत म्हणाले.

हेही वाचा:

अमोल कोल्हेंनी अमित शहांना दिल्या खास शुभेच्छा; व्हिडिओ देशभर व्हायरल

माझी मतं पचण्यासारखी नाहीत, त्यामुळं कुणाला पटणार नाहीत: उदयनराजेSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: