चीनमध्ये पुन्हा करोनाचा उद्रेक; शाळा बंद, विमान सेवा स्थगितबीजिंग: पर्यटकांच्या एका गटामार्फत संसर्ग होऊन चीनमध्ये करोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. त्यानंतर पुन्हा शाळा बंद करण्यात आल्या आहेत; तसेच अनेक विमानफेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत. चीनमध्ये सध्या देशांतर्गत संसर्ग नाही; पण देशात सलग पाचव्या दिवशी गुरुवारी १३ नवे रुग्ण आढळले आहेत.

चीनच्या उत्तर आणि वायव्य भागात पर्यटनासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या एका गटामार्फत हा संसर्ग झाल्याचे मानले जात आहे. या गटातील एका जोडप्याला करोनाची लागण झाली होती. हा गट आधी शांघायमध्ये आला. तेथून ते गान्सू प्रांतातील शीआन आणि इनर मंगोलियामध्ये गेले. त्यांच्या संपर्कात आलेले अनेक जण करोनाबाधित झाल्याचे आढळले आहे. यात काही जण राजधानी बीजिंगमधीलही आहेत.

या पार्श्वभूमीवर चीनने चाचण्यांची संख्या वाढवली आहे. गर्दीची ठिकाणे, पर्यटनस्थळे, शाळा, मनोरंजनाची ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. संसर्ग अधिक असलेल्या ठिकाणी लॉकडाउनही लागू करण्यात आला आहे. ईशान्येकडील लान्झोऊ या ४० लाख लोकसंख्येच्या शहरात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. घराबाहेर पडायचे असल्यास कोविड चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. शीआन आणि लान्झोऊ विमानतळावरून होणाऱ्या ६० टक्के विमानफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. इन मंगोलियातही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

चीनमध्ये २४ तासामध्ये फक्त १३ करोनाबाधित आढळले. मात्र, तरीही सरकारने संसर्ग रोखण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत. देशात शून्य करोनाबाधित आकडा ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: