लसीकरणावर व्हीआयपी संस्कृती लागू होऊ दिली नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी


हायलाइट्स:

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशाला संबोधन
  • लसीकरणाच्या सेन्चुरीवर पंतप्रधानांकडून पुन्हा एकदा देशाचं अभिनंदन
  • ‘मेड इन इंडिया’चा उल्लेख

नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहेत. आपल्या भाषणाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘कृतं मे दक्षिणे हस्ते जयो मे सव्य आहितः’ या वेदवाक्यासहीत केली. आपल्या देशानं एकीकडे कर्तव्याचं पालन केलं त्यामुळेच देशाला मोठं यश प्राप्त झालं, असा वेदवाक्याचा अर्थही पंतप्रधानांनी समजावून सांगितला. सोबतच, गुरुवारी भारतानं कायम केलेल्या लसीकरणाच्या १०० कोटी मात्रांच्या रेकॉर्डचा उल्लेख आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदींनी केलाय.

देशात सर्वांसाठी मोफत लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली. गरीब – श्रीमंत, गाव – शहर, दूर-सुदूर असा कोणताही भेदभाव यात करण्यात आला नाही. करोना भेदभाव करत नाही तर लसीकरणात भेदभाव कसा होऊ शकतो, हा देशाचा एकच मंत्र राहिला. यासाठी लसीकरण मोहिमेवर ‘व्हीआयपी कल्चर’ वरचढ होणार नाही हे सुनिश्चित करण्यात आल्याचंही पंतप्रधानांनी यावेळी म्हटलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या संबोधनात पुन्हा एकदा देशाचं १०० कोटी लसीचे डोस पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन केलं. हे आपल्या संकल्पसिद्धीसाठी परिश्रमांची परिकाष्ठा करणाऱ्या नव्या भारताचं चित्र असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी म्हटलंय.

आज अनेक लोक भारताच्या लसीकरण कार्यक्रमाची तुलना इतर देशांशी करत आहेत. भारताचं आज जगात कौतुक होत आहे, असंही पंतप्रधानांनी म्हटलंय.

PM Narendra Modi: आज पंतप्रधान मोदींच्या संबोधनात काय? ‘सोशल मीडिया’वर रंगली चर्चा
लसीकरणाची सेन्चुरी : ‘डब्ल्यूएचओ’कडून भारताचे अभिनंदन

जगातील मोठ्या देशांनी लसींवर रिसर्च करणं, लसी शोधून काढणं यावर वर्चस्व मिळवलं होतं. भारत अनेकदा त्यांच्या शोधांवर अवलंबून राहत होता. भारत या महामारीला कसा तोंड देणार? लस कधी उपलब्ध होणार? एवढ्या मोठ्या प्रमाणात भारत लस कसा खरेदी करणार? अशा पद्धतीचे अनेक प्रश्न समोर येत होते. परंतु, १०० कोटी लसीचे डोस हे आज यांसारख्या अनेक प्रश्नांचं उत्तर ठरलंय, असंही पंतप्रधानांनी नमूद केलंय.

भारताला जगभरात एक नवीन ‘फार्मा हब’ म्हणून स्वीकृती मिळाल्याचा दावाही यावेळी पंतप्रधान मोदींनी केलाय. भारताची लसीकरण मोहीम ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका प्रयास’चं उदाहरण असल्याचं त्यांनी म्हटलं.

यावेळी, मोदींनी स्टार्टअप कल्चरचाही उल्लेख केला. देशात अगोदर परदेशांत बनणाऱ्या वस्तूंचा उल्लेख केला जात होता. परंतु, आज लोकांना ‘मेड इन इंडिया’ची ताकद मोठी असल्याचं जाणवतंय, असं म्हणतानाच ‘करोना काळात कृषी क्षेत्राच्या योगदानाचंही त्यांनी कौतुक केलंय. आपल्या कृषी क्षेत्रानं करोना काळात अर्थव्यवस्थेला सांभाळलं. देशात खाद्यान्नाचं रेकॉर्ड उत्पादन झालं’ हेदेखील पंतप्रधानांनी आपल्या भाषणात नमूद केलंय.

​petrol diesel price hike : ‘सध्या मूठभर लोक पेट्रोल-डिझेल वापरतात’, भाजप मंत्र्याचं वक्तव्य
Aryan Khan Drugs Case: ‘शेजारच्या मित्रानं ड्रग्ज घेतले म्हणून…’, सिब्बल यांचा तपास यंत्रणेवर निशाणाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: