आणखी एक ड्रग्ज पेडलर एनसीबीच्या ताब्यात; व्हॉट्सअॅप चॅटमध्ये नाव असल्याचा दावा


हायलाइट्स:

  • एनसीबीची मुंबईत आणखी एक कारवाई
  • २४ वर्षीय ड्रग्ज पेडलर एनसीबीच्या ताब्यात
  • व्हॉट्सअॅप चॅटमध्ये नाव असल्याचा दावा

मुंबईः कोर्डिलिया क्रूझ अमली पदार्थ प्रकरणात नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोने अभिनेत्री अनन्या पांडेची चौकशी केल्यानंतर या प्रकरणात आणखी एक कारवाई केली आहे. एनसीबीने काल रात्री एका ड्रग्ज पेडलरला मुंबईतून ताब्यात घेतलं आहे.

मुंबई एनसीबी विभागानं एका २४ वर्षीय ड्रग्ज पेडलरला ताब्यात घेतलं आहे. काल रात्री एनसीबीने ही कारवाई केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबत माहिती दिली आहे. तसंच, हा ड्रग्ज पेडलर क्रुझ प्रकरणातील महत्त्वाचा संशयित असल्याचा दावा एनसीबीने केला आहे. त्यामुळं या ड्रग्ज पेडलरच्या चौकशीतून एनसीबीला आणखी माहिती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वाचाः बॉलिवूडला मुंबईबाहेर नेऊ देणार नाही; अजितदादांचा योगींना सूचक इशारा

तसंच, एनसीबीने ताब्यात घेतलेल्या या ड्रग्ज पेडलरचे नाव व्हॉट्सअॅपवरील ड्रग्जसंबंधित चॅटमध्ये असल्याचा एनसीबीला संशय आहे. त्याअनुषंगाने एनसीबी तपास करत आहेत. आज एनीसीबी कार्यालयात त्याची चौकशी करण्यात येणार आहे.

दरम्यान, एनीसीबीने गेल्या दोन दिवसांत मुंबई व परिसरात ड्रग्ज संबंधित सहा धाडी टाकल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अनन्या पांडेला समन्स

आर्यन खानच्या मोबाइलमध्ये व्हॉट्सअॅपवर अनन्या पांडेचा नंबर ‘पॉप अप’ झाल्याचे दिसले आहे. त्यामुळे नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोने (एनसीबी) आता अभिनेत्री अनन्या पांडे हिला समन्स बजावला आहे. आजही ११ वाजता अनन्या पांडेची चौकशी होणार आहे.

वाचाः अमानुष! कोंबडीच्या पिल्लाची शिकार केल्याचा रागातून शेजाऱ्यांने मांजरीवर झाडली गोळी

एनसीबीला संशय काय?

अनन्या आणि आर्यन हे संपर्कात होते, असे व्हॉट्सअॅप चॅटवरून स्पष्ट झाले आहे. तसेच त्यांच्या चॅटमध्ये सांकेतिक शब्दांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळेच अनन्याही अमली पदार्थ दलालांच्या संपर्कात होती का, हे शोधले जात आहे. त्यादृष्टीनेच तिची चौकशी केली जात आहे, असे एनसीबीतील सूत्रांनी सांगितले.

वाचाः
समीर वानखेडे यांना पुन्हा नवाब मलिक यांचे आव्हान; ‘त्या’ दाव्यावर ठामSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: