हायलाइट्स:
- राज्यातील चित्रपटगृहे, नाटयगृहे आजपासून सुरू
- अजित पवार यांच्या उपस्थितीत नाट्यगृहे सुरू
- फिल्मसिटीबाबत योगी सरकारला दिला इशारा
राज्यातील चित्रपटगृहे व नाट्यगृहे आज शुक्रवारपासून सुरू होत आहेत. करोनामुळं बंद असलेल्या नाटकाची घंटा आता वाजणार आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रातिनिधीक स्वरुपात तिसरी घंटा वाजवून नाट्यगृह पुन्हा सुरू करण्यात आली. यावेळी बालगंधर्व रंगमंदिरात अजित पवारांच्या हस्ते रंगमंच पूजन करण्यात आलं. अजित पवार यांनी चित्रपटसृष्टी व नाट्यसृष्टीबाबत भाष्य केलं आहे. तसंच, दिवाळीनंतर १०० टक्के क्षमतेनं नाट्यगृह सुरू करण्याचा विचार करू, असं संकेतही अजित पवारांनी दिले आहेत.
वाचाः परमबीर सिंह यांचा पाय खोलात; खंडणीखोरांची पोलिसांकडून धरपकड
‘सरकार चालवत असताना हे बंद करा, ते बंद करा, म्हणायला आम्हालाही आवडत नाही. मात्र, नाईलाज असतो. खरंतर असा प्रसंग आपल्यावर यायला नको होता. पण निसर्गाच्या पुढे काहीही नाही. १९ महिने सातत्याने सर्व बंद होतं. कधी सुरु करणार असा प्रश्न सातत्याने विचारण्यात यायचा. मात्र, आपल्याकडून चुका होऊ नये आणि तिसरी लाट येऊ नये यासाठी सरकार म्हणून खबरदारी घ्यावी लागली,’ असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.
वाचाः हाच का निष्पक्ष तपास?; अनिल देशमुख प्रकरणावरून सीबीआयवर सरकारचा आक्षेप
‘बालगंधर्वच्या नुतनीकरणाबाबतही अजित पवारांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. तसंच, सध्या आमच्याकडे ५६ हजार कलाकारांची यादी आहे. त्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून ५ हजार रुपये देण्याचा प्रयत्न केला. इथून पुढे कलावंतांना त्रास होणार नाही याची काळजी घेणार आहे,’ असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
वाचाः अमानुष! कोंबडीच्या पिल्लाची शिकार केल्याचा रागातून शेजाऱ्यांने मांजरीवर झाडली गोळी