मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर या आदेशाची अंमलबजावणी झाल्यास आजच्या वाढीनंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA 31 टक्के होईल. या वर्षी जुलैमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने १ जुलैपासून केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्ता आणि महागाई दिलासा (DR) दर ११ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला होता. यासह डीएचा नवीन दर १७ टक्क्यांवरून वाढवून २८ टक्के करण्यात आला होता. त्याचबरोबर आज DA मध्ये ३ टक्के वाढ झाल्यामुळे DA चा नवीन दर ३१ टक्के झाला आहे. म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाचा ३१ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे.
Vaccine Century: भारताकडे १०० कोटी लसींचं सुरक्षा कवच; पंतप्रधानांच्या भारतीयांना शुभेच्छा
कधी मिळणार फायदा?
महागाई भत्त्याचे नवे दर हे १ जुलै २०२१ पासून लागू होतील. मूळ वेतन आणि पेन्शनच्या सध्याच्या २८ टक्क्यांवर हे अतिरिक्त ३ टक्के देय असेल. या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या ४७.१४ लाख कर्मचारी आणि ६८.६२ लाख पेन्शनधारकांना फायदा होईल. यामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर दरवर्षी ९,४८८.७० कोटी रुपयांचा बोजा पडेल.