mamata banerjee to visit goa : गोव्यातही ‘खेला होबो’! CM ममता बॅनर्जी पहिल्यांदाच येणार भेटीवर


पणजीः पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आता राज्याबाहेरही तृणमूल काँग्रेसला (टीएमसी) बळकट करण्यात व्यग्र आहेत. त्रिपुरा आणि आसामनंतर आता तृणमूल काँग्रेस (TMC) गोव्याची ( mamata banerjee to visit goa ) निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी २८ ऑक्टोबरला गोव्याला भेट देणार आहेत. त्या १ नोव्हेंबरला पश्चिम बंगालला परतणार आहेत. ममता बॅनर्जींचा गोवाचा हा पहिलीच दौरा असेल.

गोव्याच्या राजकीय पटलावर तृणमूल काँग्रेसच्या पदार्पणामुळे आणि सत्ताधारी भाजप, विरोधी काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि शिवसेना निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेल्या दोन प्रादेशिक पक्षांच्या घोषणेमुळे ही निवडणूक रंजक ठरणार आहे. ‘रिवॉल्यूशनरी गोअन्स’ आणि ‘गोएन्चो आवाज’ हे दोन प्रादेशिक पक्ष पहिल्यांदा निवडणुकीत नशीब आजमावतील. याशिवाय गोवा फॉरवर्ड पार्टी (जीएफपी) आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी (एमजीपी) हेही सत्तेच्या शर्यतीत आहेत.

petrol diesel price hike : ‘सध्या मूठभर लोक पेट्रोल-डिझेल वापरतात’, भाजप मंत्र्याचं वक्तव्य

दरम्यान, गोव्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेते काँग्रेस सोडून टीएमसीमध्ये दाखल झाले आहेत. तृणमूल काँग्रेस भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. उत्तर गोवा काँग्रेस सेवा दल प्रमुख उल्हास वासनकर यांनी आपल्या समर्थकांसह आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांसह बुधवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याशिवाय काँग्रेसच्या महिला शाखेच्या माजी सरचिटणीस प्रिया राठोडही तृणमूल काँग्रेसमध्ये गेल्या आहेत. यापूर्वी गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते लुईझिनो फालेरो देखील टीएमसीमध्ये दाखल झाले होते.

p chidambaram : ‘जो गोव्याची निवडणूक जिंकेल तोच आगामी लोकसभा निवडणूकही जिंकेल’, चिदम्बरम यांचा दावा

अनेक राज्यांमध्ये निवडणुका लढवण्याची घोषणा करून तृणमूल काँग्रेस राष्ट्रीय पातळीवरील राजकारणावर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आता आपले लक्ष दिल्लीवर आहे, असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यापूर्वी अनेकदा म्हटल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: