​petrol diesel price hike : ‘सध्या मूठभर लोक पेट्रोल-डिझेल वापरतात’, भाजप मंत्र्याचं वक्तव्य


लखनऊः यूपी सरकारचे क्रीडा युवा कल्याण मंत्री उपेंद्र तिवारी एका वक्तव्यामुळे वादात ( petrol diesel price hike ) आले आहेत. डिझेल आणि पेट्रोलच्या दरवाढीवर त्यांना प्रश्न विचारण्यात ( up sports minister upendra tiwari ) आला होता. मूठभर लोक डिझेल-पेट्रोल वापरतात. ९५ टक्के लोक डिझेल पेट्रोल अजिबात वापरत नाहीत. सामान्य माणसाचे उत्पन्न वाढले आहे. डिझेल आणि पेट्रोलमध्ये कोणतीही दरवाढ झालेली नाही.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात बोलले मंत्री

‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या कार्यक्रमासाठी मंत्री उपेंद्र तिवारी जालौनमधील ओराई इथे आले होते. कार्यक्रमाला संबोधित केल्यानंतर ते माध्यमांशी बोलताना त्यांनी समाजवादी सरकारवरही निशाणा साधला. भाजप सरकारमध्ये युवकांना रोजगार मिळाला आहे. तसेच राज्य सरकार ग्रामीण भागातील कलागुणांना वाव देण्यासाठी खेळाचा महाकुंभ आयोजित करणार आहे. समाजवादी सरकारमध्ये पीसीएस आणि पीपीएस बनवण्याचे कारखाने चालवले जात होते. लोकसेवा आयोगात मोठा घोळ घातला गेला, असा आरोप त्यांनी केला.

pm modi interacts with top oil and gas ceos : पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार? PM मोदींची तेल कंपन्यांच्या

‘९५ टक्के लोक डिझेल वापरत नाहीत’

महागाई आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरावर ते बोलले. सध्या मूठभर लोक डिझेल-पेट्रोल वापरतात. ९५ टक्के लोक डिझेल-पेट्रोल अजिबात वापरत नाहीत. सामान्य माणसाचे उत्पन्न वाढले आहे. डिझेल-पेट्रोलची कोणतीही दरवाढ झालेली नाही, असं मंत्री उपेंद्र तिवारी म्हणाले. विरोधकांकडे कोणताही मुद्दा नाही. केंद्र आणि यूपी सरकारमध्ये नागरिकांचं दरडोई उत्पन्न वाढलं आहे. सरकारने १०० कोटीहून अधिक नागरिकांचं मोफत लसीकरण केलं आहे.

petrol and diesel : पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्यावरून केंद्र सरकारमध्ये खल



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: