माजी आमदार सुधाकरपंत परिचारक जयंती निमित्तचा सेवा सप्ताह समाप्त

माजी आमदार सुधाकरपंत परिचारक जयंती निमित्तचा सेवा सप्ताह समाप्त

पंढरपूर /प्रतिनिधी – माजी आमदार सुधाकरपंत परिचारक sudhakarpant paricharak यांच्या जयंती निमित्त आमदार प्रशांत परिचारक MLA Prashant Paricharak यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या सेवा सप्ताहामध्ये प्रभाग क्रमांक ६ मध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात अक्षय वाडकर मित्र परिवाराच्या माध्यमातून आजच्या शेवटच्या टप्प्यातील आयोजित केलेल्या मोफत दंत तपासणी शिबिराचे उद्घाटन पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे युवक नेते प्रणव परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने दंत तपासणी करून घेतली

  गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या सेवा सप्ताहात प्रभागातील आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी उस्फुर्त सहभाग घेतला. आणि सेवेची संधी दिली याबद्दल अक्षय वाडकर मित्र परिवाराच्यावतीने सर्वांचे आभारी आहोत, असे अक्षय वाडकर यांनी सांगितले.

  यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे, वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या मार्गदर्शक बंधूंचे,माता भगिनींचे,तरुण सहकरी मित्रांचे अक्षय वाडकर यांनी मनापासून आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: