covid vaccination doses : ‘आळशी कुठले’, करोना लसीचा दुसरा डोस न घेणाऱ्यांना अदर पुनावालांनी दिला ‘डोस’


नवी दिल्लीः करोना लसीकरण मोहीमेत देशात १०० कोटी डोस मोठा टप्पा ओलांडला आहे. यावर सीमर इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (SII) सीईओ अदर पुनावाला यांनी आनंद व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींची दूरदृष्टी आणि ते यशाचे श्रेय त्यांना जाते. यासोबतच पुनावाला यांनी लसीचा दुसरा डोस न घेणाऱ्यांवर नाराजीही व्यक्त केली आहे. लसीचा दुसरा डोस घेण्याची वेळ येऊनही अनेकांनी तो घेतलेला नाही. असे नागरिक आळशी आहेत, असं पुनावाला म्हणाले. जवळपास १० कोटी नागरिकांनी करोनावरील लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. त्यांची कालमर्यादाही निघून गेली आहे.

देशात १६ जानेवारीला करोनावरील लसीकरण मोहीम सुरू झाली होती. यानुसार १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. देशात १८ वर्षांवरील लोकसंख्या जवळपास ९४ कोटी आहे. या लोकसंख्येपैकी ७५ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर ३० टक्के नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

सरकारने डिसेंबर २०२१ पर्यंत सर्व प्रौढ लोकसंख्येला म्हणजे ९४ कोटी नागरिकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. म्हणजेच २५ टक्के लोकसंख्येला लवकरात लवकर लस देण्याचे लक्ष्य आहे. नागरिकांना करोनावरील लसीचा दुसरा डोस देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

Vaccine Century: भारताकडे १०० कोटी लसींचं सुरक्षा कवच; पंतप्रधानांच्या भारतीयांना शुभेच्छा

देशात जवळपास ९५ टक्के नागरिकांना करोनावरील मोफत लस दिली गेली आहे. जगात सर्वाधिक १०० कोटी नागरिकांचे लसीकरण भारतात झाले आहे. देशात जुलै महिन्यात लसीकरण मोहीमेने वेग घेतला. आता लहान मुलांच्या लसीकरणाचाही विचार सुरू आहे. लहान मुलांच्या लसीकरणाला पुढच्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुरवात होण्याची शक्यता आहे. बूस्टर किंवा तिसरा डोस देण्याबाबत सरकारचा सध्यातरी कुठलाही विचार नाहीए.

भारताचा ऐतिहासिक रेकॉर्ड : कोविड लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा पारSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: