IND vs PAK T20 World Cup: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी सर्व टेन्शन गेले; भारताची प्लेइंग इलेव्हन तयार


दुबई: टी-२० वर्ल्डकपमधील सर्वात हाय प्रोफाईल मॅच २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान लढतीवर या दोन्ही देशातील नव्हे तर संपूर्ण जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असेल. या सामन्यात विजय मिळवण्याची भारताची इच्छा असेल कारण टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत याआधी कधीच पाकिस्तानविरुद्ध पराभूत झाला नाही. वर्ल्डकप सुरू होण्याआधी भारताला काही खेळाडूंच्या फॉर्मबद्दल काळजी होती. पण गेल्या ४ दिवसात भारताची सर्व चिंता दूर झाली आहे.

वाचा- ना विराट, ना रोहित; भारताच्या मोठ्या विजयामागे होता मेंटॉर धोनीचा मास्टर प्लॉन

मुख्य स्पर्धा सुरू होण्याआधी भारताने दोन सराव सामने खेळेल. पहिल्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळून भारताने विजेतेपदाचे दावेदार आपणच असल्याचे दाखवून दिले. याच या सामन्यात भारताच्या अनेक टेन्शन दूर झाले, यामुळे कर्णधार विराट कोहलीने सुटकेचा श्वास सोडला असेल.

वाचा- भारताविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानचा पराभव; तर विद्यमान विजेत्यांना अफगाणिस्ताने दिला धक्का

पाकिस्तानविरुद्धच्या लढती आधी भारताची प्लेइंग इलेव्हनदेखील तयार झाली आहे. जाणून घेऊयात कशी असेल ती…

सलामीची जोडी- पहिल्या सराव सामन्यात रोहित शर्माने विश्रांती घेतली होती. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रोहितने दमदार फलंदाजी केली. त्याने ४१ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ६० धावा केल्या. त्याचा जोडीदार केएल राहुलने देखील ३९ धावा केल्या. राहुल आयपीएलपासूनच फॉर्ममध्ये आहे. या दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई केली. दोघांची कामगिरी पाहता पाकिस्तानविरुद्धच्या लढाईत सलामीची जोडी म्हणून रोहित शर्मा आणि केएल राहुल हे दोघेच असतील.

वाचा- Video: धोनीने सूत्रे हाती घेतली; सर्वात आधी घेतली या खेळाडूची शाळा

वरुण दबावात, भुवी ट्रकवर परतला-
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला संधी दिली नव्हती. पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याला संधी दिली गेली. स्टायोनिसने त्याचे चौकाराने स्वागत केले. पण त्यानंतरच्या पाच चेंडूत त्याने फक्त ४ धावा दिल्या. वरुणला १६व्या षटकात पहिली ओव्हर दिली. त्यानंतर १९व्या षटकात त्याला रोहितने पुन्हा चेंडू दिला. त्या षटकात वरुणने १५ धावा दिल्या. या सामन्यात वरुण प्रभाव टाकू शकला नाही. पण तो कमबॅक नक्की करू शकले. या उटल पहिल्या सामन्यात ४ षटकात ५४ धावा देणारा जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमार परत ट्रॅकवर परतलाय.

वाचा- एका व्यक्तीमुळे भारतीय ड्रेसिंग रुममधील वातावरण बदलले; या खेळाडूने केला मोठा खुलासा

मधली फळी- विराट कोहलीने याआधीच जाहीर केल्या प्रमाणे सलामीच्या जोडीनंतर तिसऱ्या क्रमांकावर तो स्वत: फलंदाजीला येणार आहे. त्यानंतर सूर्यकुमार यादव असेल. सूर्यने पहिल्या सामन्यातील चूक पुन्हा केली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने २७ चेंडूत ३८ धावा केल्या. या सामन्यता खरी चाचणी हार्दिक पंड्याची होती. त्याने ८ चेंडू खेळले आणि षटकारासह विजय मिळवून दिला. हे दोन्ही फलंदाजी लयीमध्ये दिसत आहेत त्यामुळे भारताचे मोठे टेन्शन कमी झाले आहे.

अश्विनला मिळेल संधी- भारताच्या अंतिम ११ संघात दोन फिरकीपटूंना स्थान मिळू शकते. यात रविंद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती ही नावे आघाडीवर आहेत. पण अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकाच षटकात दोन विकेट घेऊन स्वत:ची दावेदारी मजबूत केली आहे. ऑस्ट्रेलियाने ११ धावात ३ विकेट गमावल्या होत्या. त्यापैकी २ अश्विनने घेतल्या होत्या. अश्विनने डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांना माघारी पाठवले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: