amit shah in dehradun : अमित शहांचा उत्तराखंड दौरा, चारधाम यात्रा पुन्हा सुरू; मृतांची संख्या ६४ वर


डेहराडूनः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहेत. पाऊस आणि पुरामुळे नुकसान झालेल्या भागांची हवाई पाहणी अमित शहा यांनी केली. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि नायब राज्यपाल लेफ्टनंट जनरल (निवृत्त) गुरमीत सिंगही त्यांच्यासोबत होते. पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माध्यमांना माहिती दिली. उत्तराखंडमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरासंबंधी आपण केंद्र आणि राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. अतिवृष्टीचा इशारा हा योग्यवेळी मिळाल्यास जीवितहानी किंवा वित्तहानी नियंत्रणात आणण्यास मदत होईल. पाऊस थांबल्याने आणि पूरस्थिती निवळल्याने चारधाम यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती अमित शहांनी दिली.
उत्तरखंडमधील अतिवृष्टी आणि पुरात एकाही पर्यटकाचा मृत्यू झालेला नाही. जवळपास ३५०० हून अधिक नागरिकांना वाचवण्यात आलं. तसंच १६ हजार नागरिकांना खबरदारी म्हणून सुरक्षित ठिकाणी हलवलं गेलं. एनडीआरएफच्या १७ टीम, एसडीआरएफच्या ७ टीम आणि पीएसी १५ कंपन्या आणि ५ हजार पोलीस कर्मचारी तैनात आहेत, असं अमित शहांनी सांगितलं.
uttarakhand rain : बापरे! उत्तराखंडमध्ये पावसाचे तांडव, १०७ वर्षांचा विक्रम मोडला; एकूण ४६ जणांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये ६४ नागरिकांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनात एकूण ६४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ११ हून अधिक नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. ट्रेकिंग टीममधील २ जणांपैकी १ जण बेपत्ता आहे. नैनीताल, अल्मोडा, हल्दवानीमधील सर्व रस्ते मोकळे करण्यात आले असून वाहतूक सुरू झाली आहे. वीज प्रकल्प लवकर सुरू होतील. राज्यातील मोबाइल नेटवर्क ८० टक्के सुरू झाले आहे, असं अमित शहा म्हणाले.

Kerala Flood: कोकण, केरळच्या महापूरावर काय म्हणाले पर्यावर तज्ज्ञ माधव गाडगीळ…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: