Madhya Pradesh: भारतीय वायुसेनेच्या लढावू ‘मिराज’ विमानाला अपघात, पायलट सुरक्षित


हायलाइट्स:

  • प्रशिक्षणा दरम्यान वायुसेनेच्या विमानाला अपघात
  • विमानाच्या मागच्या बाजुचा जवळपास अर्धा भाग जमीनमध्ये घुसलेल्या अवस्थेत आढळला
  • विमान दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश

भिंड, मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात भारतीय वायुसेनेच्या एका लढावू विमानाला अपघात झालाय. तांत्रिक बिघाडानंत वायुसेनेचं मिराज २००० हे विमान शेतात कोसळलं. या अपघातात पायलट सुखरुप बचावल्याची प्राथमिक माहिती हाती येतेय.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. भिंड जिल्ह्यातील ग्रामीण भागात ही दुर्घटना घडली.

भिंडपासून जवळपास ६ किलोमीटर दूर मनकाबाद भागातील एका बाजरीच्या शेतात हे विमान कोसळलं. एक ट्रेनी पायलट या विमानासह उड्डाण घेत असल्याची माहिती मिळतेय. विमानाला अपघात होत असल्याचं लक्षात येताच पायलटनं प्रसंगावधान राखत पॅराशूटच्या सहाय्यानं लँडिंग करण्यासाठी विमानाच्या बाहेर उडी घेतली. फ्लाईट लेफ्टनंट अभिलाष हे सुरक्षित असल्याची माहिती मिळतेय.

Indian Pakistan: पाणबुडी रोखल्याच्या पाकिस्तानच्या दाव्यावर भारताचं प्रत्यूत्तर…
bofors guns at the tawang : भारताची ‘मुलूखमैदानी तोफ’ अरुणाचलमध्ये LAC वर तैनात, चिन्यांच्या चिंधड्या उडवणार
वायुसेनेनं एका ट्विटद्वारे या अपघाताची माहिती दिलीय. तसंच या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. ‘भारतीय वायुसेनेच्या मिराज २००० या विमानाला आज सकाळी केंद्रीय क्षेत्रात एका प्रशिक्षण उड्डाणादरम्यान तांत्रिकी बिघाडाला सामोरं जावं लागलं. परंतु, या अपघातात पायलट सुरक्षित बाहेर पडण्यात यशस्वी ठरला. दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत’, असं माहिती वायुसेनेच्या अधिकृत सोशल मीडिया हॅन्डलवरून देण्यात आलीय.

अपघातानंतर विमानाचा मलबा आणि त्यातून निघणारा धूर स्थानिकांच्या नजरेस पडला. विमानाच्या मागच्या बाजुचा जवळपास अर्धा भाग जमीनमध्ये घुसलेल्या अवस्थेत होता. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर ताबा मिळवत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं.

Vaccine Century: भारताकडे १०० कोटी लसींचं सुरक्षा कवच; पंतप्रधानांच्या भारतीयांना शुभेच्छा
भारताचा ऐतिहासिक रेकॉर्ड : कोविड लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा पार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: