सचिन सावंत यांच्यानंतर नाना पटोलेंचा आणखी एका काँग्रेस नेत्याला धक्का


Authored by | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Oct 21, 2021, 12:02 PM

सचिन सावंत यांच्याकडून मुख्य प्रवक्ते पद काढून घेतल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आणखी एका जुन्या जाणत्या नेत्याला धक्का दिला आहे.

 

नाना पटोले

हायलाइट्स:

  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा धडाका सुरूच
  • सचिन सावंत यांच्यानंतर आणखी एका नेत्याला धक्का
  • पक्षविरोधी कारवायांप्रकरणी अनिश्चित काळासाठी केले निलंबित

अहमदनगर: पक्ष संघटना मजबूत आणि आक्रमक करीत असल्याचा दावा करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या धडाकेबाज निर्णय घेत आहेत. त्यावरून पक्षात खळबळ सुरू असली तरीही त्यांचा धडाका सुरूच आहे. सचिन सावंत यांना मुख्य प्रवक्ते पदावरून डच्चू दिल्यानंतर पटोले यांनी आता अहमदनगरमधील पक्षाचे जुने कार्यकर्ते आणि विविध पदांवर काम केलेल्या बाळासाहेब भुजबळ यांना पक्षातून अनिश्चित काळासाठी निलंबित करण्यात आले आहे. पक्षविरोधी कारवाया करीत असल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. भुजबळ यांनी केलेला खुलासाही अमान्य करण्यात आला आहे.

तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळात नियुक्त करण्यात आलेले शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासोबत भुजबळ यांचे पटत नव्हते. भुजबळ यांना प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी ८ सप्टेंबर रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. शहर जिल्हा काँग्रेसने आयटी पार्क प्रकरणी घेतलेल्या भूमिकेविरोधात केलेली जाहीर पत्रकबाजी, मनपा तिप्पट करवाढीच्या संदर्भात पक्ष विरोधी भूमिका घेत मनपात केलेले आंदोलन, महापौर निवडणुकीवेळी काळे यांच्या विरोधात केलेली पत्रकबाजी, तिळगुळ वाटप कार्यक्रम आयोजन करत प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, माजी नगसेवक निखिल वारे यांच्या उपस्थितीत काळे यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटविण्याचा केलेला ठराव, अहमदनगर शहर काँग्रेस व भिंगार काँग्रेसच्या नावाचा गैरवापर करत अधिकृत पक्ष संघटनेला समांतर भासावे अशा पद्धतीने काढलेले मोर्चे, निदर्शने, सोशल मीडियावर शहर काँग्रेस अध्यक्ष असे खोटे पद लावत व्हायरल केलेल्या पोस्ट असे विविध आरोप भुजबळ यांच्यावर ठेवण्यात आले होते. याबाबत भुजबळ यांनी उबेद शेख, श्याम वागस्कर, फिरोज शफी खान, अभिजीत कांबळे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष पटोले यांची मागील आठवड्यात मुंबईत भेट घेऊन आपला खुलासा सादर केला होता. भुजबळ यांनी सादर केलेला खुलासा असमाधानकारक असल्याचे सांगत त्यांना पक्षातून निलंबित केल्याचे पत्र प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी दिले आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिली.

जिल्हाध्यक्षपदी काळे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी कार्यकारिणीत बदल केले. ब्लॉक अध्यक्षपदी मनोज गुंदेचा यांची नियुक्ती करण्यात आली होती. या निर्णयाला तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही मान्यता दिली होती. त्यानंतर भुजबळ आणि काळे यांच्यातील संघर्ष सुरू झाला. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप व काँग्रेसचे काळे यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. त्यातच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या आमदार जगताप यांचे समर्थन होईल अशा भूमिका भुजबळ घेत असल्याचा आरोप आहे. त्यामुळेच त्यांना निलंबित करण्यात काळे यशस्वी झाल्याचे मानले जात आहे. मधल्या काळात काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरू आहे. अलीकडेच नगरमधील इतर पक्षांतील कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईत प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. तेव्हाही पटोले यांनी काळे यांच्या कामाचे कौतुक केले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : ahmednagar: nana patole suspends veteran congress leader balasaheb bhujbal
Marathi News from Maharashtra Times, TIL Network



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: