भारताविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानचा पराभव; तर विद्यमान विजेत्यांना अफगाणिस्ताने दिला धक्का


दुबई: टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध होणाऱ्या लढतीच्या आधी पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेने त्यांचा ६ विकेटनी पराभव केला. पहिल्या सराव सामन्यात पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा पराभव केला होता. पण दुसऱ्या लढतीत पाकिस्तानचा संघ उघडा पडला.

वाचा- Video: धोनीने सूत्रे हाती घेतली; सर्वात आधी घेतली या खेळाडूची शाळा

आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने १८७ धावांचे विशाल लक्ष्य दिले होते. तरी देखील त्यांचा पराभव झाला. आफ्रिकेकडून डेर डुसेनने ५१ चेंडूत १०१ धावा केल्या. तर कर्णधार टेंबा बावुमाने ४२ चेंडूत ४६ धावा केल्या. अखेरच्या षटकात आफ्रिकेला विजयासाठी १९ धावांची गरज होती आणि त्यांनी ते पार केले.

वाचा- एका व्यक्तीमुळे भारतीय ड्रेसिंग रुममधील वातावरण बदलले; या खेळाडूने केला मोठा खुलासा

पाकिस्तानचा सर्वात भरवश्याचा फलंदाज कर्णधार बाबर आझमला या सामन्यात धावा करता आल्या नाहीत. फखर जमानने ५२ धावा केल्या. तर शोएब मलिकने २८ तर असिफ अलीने ३२ धावा केल्या. पण आफ्रिकेने धमाकेदार फलंदाजी करत पाकिस्तानला धक्का दिला. भारताविरुद्धच्या लढती आधी झालेल्या या पराभवाचा फटका पाकिस्तानला बसू शकतो.

वाचा- सराव सामना पडला महागात; टी-२० वर्ल्डकपमध्ये इंग्लंडला बसला मोठा झटका

सराव सामन्यात आणखी एक धक्कादायक विजयाची नोंद झाली. विद्यमान विजेते वेस्ट इंडिजचा अफगाणिस्तानने ५६ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत त्यांनी १८९ धावा केल्या. उत्तरादाखल वेस्ट इंडिजला फक्त १३३ धावा करता आल्या. गेल्या म्हणजेच २०१६च्या टी-२० वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवाऱ्या वेस्ट इंडिज संघाला पहिल्या दोन्ही सराव सामन्यात पराभव स्विकारावा लागलाय.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: