रशियाचा तालिबानला इशारा
मॉस्को फॉर्मेटमध्ये रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी तालिबानला इशारा दिला आहे. तालिबानच्या प्रतिनिधींनी सांगितले की, अफगाणिस्तानमधील निर्वासित नागरिकांच्या माध्यमातून दहशतवाद आणि अमली पदार्थाची तस्करी वाढू शकते. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर शेजारील देशाविरोधात होऊ नये असेही तालिबानला रशियाने बजावले.
वर्ष २०१७ पासून मॉस्को फॉर्मेटमध्ये अफगाणिस्तानच्या मुद्याला प्रमुख मुद्दा बनवण्यात आला होता. या बैठकीत सहभागी होण्यासाठी चीन, भारत, इराण, पाकिस्तानसह १० देशांना निमंत्रण देण्यात आले होते. या बैठकीसाठी अमेरिकेलाही निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, अमेरिका या बैठकीत सहभागी झाली नाही.
अफगाणिस्तानमधील ‘टोलो न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, तालिबानला या बैठकीपासून मोठ्या अपेक्षा आहेत. अफगाणिस्तानवर आर्थिक निर्बंध लागू झाल्यानंतर देशावर आर्थिक संकट, उपासमारीचा धोका निर्माण झाला आहे. तालिबानने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सर्वसमावेशक सरकार तयार केले नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर इतर देशांकडून तालिबानला मान्यता दिली जात नाही.